शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतकऱ्यांनी उतरविला पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणारा प्रांत आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाले आहेत. अवेळी येणाऱ्या पावसाने दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यातून दरवर्षी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी पीक विमा कंपनीने स्वीकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खरिपाचा पीक विमा उतरविला. 

ठळक मुद्दे२२ कोटींचा प्रीमियम जमा

रुपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार २२५ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. यातून सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीदाचे क्षेत्र संरक्षित केले. याकरिता शेतकऱ्यांनी २२ कोटींचा विमा हप्ता भरला आहे.यवतमाळ जिल्हा हमखास पाऊस बरसणारा प्रांत आहे. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हैराण झाले आहेत. अवेळी येणाऱ्या पावसाने दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यातून दरवर्षी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी पीक विमा कंपनीने स्वीकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खरिपाचा पीक विमा उतरविला. विमा उतरविण्यासाठी प्रारंभी १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर विमा उतरविण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील तीन लाख नऊ हजार २२५ शेतकऱ्यांना आपले पीक  संरक्षित करता आले. यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाचे पीक संरक्षित करण्यासाठी तयारी दर्शविली. मात्र, पिकांचा विमा अधिक होता. त्यामुळे इच्छा असतानाही शेतकऱ्यांना कपाशीचा विमा काढता आला नाही. त्या तुलनेत सोयाबीनचा विमा प्रीमियम कमी होता. परिणामी विमा उतरविताना शेतकऱ्यांचा सर्वाधिक जोर सोयाबीनच्या क्षेत्राकडे राहिला. याशिवाय मूग, उडीद आणि इतर पिकेही संरक्षित करण्यात आली.जितक्या रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला, तितक्याच रुपयांचा वाटा केंद्र आणि राज्य शासनाने विमा कंपनीकडे जमा केला आहे. यातून पीक संरक्षित झाले आहे. मात्र मोबदला देताना विमा कंपन्यांकडून अनेक निकष टाकून भरपाई टाळली जाते. 

कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेशपीक विमा उतरविताना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विमा ऐच्छीक असल्याने गतवर्षाचा अनुभव पाहता बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमाच उतरविला नाही. यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा