शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

तीन कंपन्यांनी ‘आधार’ सोडला

By admin | Updated: November 8, 2014 22:44 IST

जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत.

नोंदणी संथगतीने : दोन हजार गावांसाठी ५७ केंद्रयवतमाळ : जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत. त्यामुळे अवघ्या वर्षभरात नोंदणीची मोहीम पूर्ण करण्याचे शासनाचे आश्वासन हवेत विरले आहे.जिल्ह्यातील २७ लाख ७२ हजार ३४८ नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी पात्र आहेत. मात्र नोंदणीसाठी यंत्रणाच नसल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आधारकार्ड काढण्याची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविण्यात आली होती. यामध्ये वक्रांगी, नेटलिंक आणि फिनोटेक या कंपन्यांचा समावेश होता. या तीनही कंपन्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता नोंदणीचे काम बंद केले. १३ जानेवारी २०१४ पासून या कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाशी कुठलाही संपर्क साधला नाही. या कंपनीच्या कामकाजाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आधारकार्ड नोंदणीची संपूर्ण जबाबदारी सीएमएस कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीच्या मदतीने ई-महासेवाकेंद्र चालविले जातात. या ई-महासेवा केंद्रांकडे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ८० केंद्राकडे हे काम सोपविण्यात आले. यातील ५७ केंद्रांवर सध्याच्यास्थितीत आधारकार्ड काढले जातात. दोन हजार ४० महसुली गावांसाठी ५७ आधारकार्ड केंद्र अपुरे आहे. त्यामुळे या केंद्रावर एकच गर्दी उडत आहे तर, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या केंद्राची माहितीच नाही. यवतमाळ तालुक्यात ८ केंद्र, आर्णी तालुक्यात ७ केंद्र, घाटंजी, राळेगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यात प्रत्येकी १ केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात १२, महागाव तालुक्यात ३, उमरखेड तालुक्यात ८ आणि केळापूर तालुक्यात ५ केंद्र उघडण्यात आले आहेत. मारेगाव तालुक्यात २ तर वणी तालुक्यात ६ केंद्र उघडण्यात आले आहे. (शहर वार्ताहर)