शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

स्वगावी परतण्यासाठी ३५ कुटुंबांची नागरी सुविधा केंद्राकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

या काळात ‘आहे त्याच ठिकाणी थांबण्या’च्या सूचना आहेत. संबंधितांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. याकरिता स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. काही व्यक्ती या अनुषंगाने पुढे आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला सोडायचे झाल्यास आरोग्य, महसूल आणि पोलीस यंत्रणेकडून संपूर्ण अहवाल घेणे आवश्यक आहे. या टिमचे नेतृत्व तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे करीत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन म्हणते, आहे तिथेच थांबा : भोजनाची आणि निवासाची १४ एप्रिलपर्यंत प्रशासन करणार व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची धास्ती पसरलेली असताना परजिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी स्वगावी येण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तर कामानिमित्त जिल्ह्यात आलेले काही नागरिक परजिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्रदेशभरात लॉकडाऊन असल्याने या नागरिकांची अडचण झाली आहे. स्वगावी जाण्यासाठी अशा ३५ कुटुंबांचे अर्ज नागरी सुविधा केंद्राकडे आले असले तरी तूर्त त्यांना ‘आहे तिथेच थांबा’ अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.मात्र अशा नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था प्रशासन करणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.मुंबई, चंद्रपूर, अहमदाबाद, सुरत, नागपूर, भुसावळ, छत्तीसगड, बडनेरा आणि जिल्ह्यातील काही तालुक्यांतून ३५ अर्ज नागरी सुविधा केंद्राकडे आले आहेत. या ३५ कुटुंबांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे. त्यांना सध्याच इतर ठिकाणी जाता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट के ले. अत्यंत आवश्यक अशा आरोग्यसेवेसाठीच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नागरिकांना पाठविल्या जाणार आहे. मात्र सर्वांना पाठविल्या जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.या काळात ‘आहे त्याच ठिकाणी थांबण्या’च्या सूचना आहेत. संबंधितांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. याकरिता स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. काही व्यक्ती या अनुषंगाने पुढे आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला सोडायचे झाल्यास आरोग्य, महसूल आणि पोलीस यंत्रणेकडून संपूर्ण अहवाल घेणे आवश्यक आहे. या टिमचे नेतृत्व तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे करीत आहेत. नायब तहसीलदार अजय गौरकार, नंदकुमार बुटे, श्याम मॅडमवार, गजानन टाके, धिरज डाखरे, गोपाळ गायकवाड, रवींद्र मानकर, मिलिंद बोरकर, प्रमोद गुल्हाने, नितेश वाढई ही टिम नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.६९ व्यक्तींवर कारवाईजिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी लागू आहे. शुक्रवारी १८८ आणि १४४ या कलमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ व्यक्तींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. नियम मोडणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाने दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस