पुसद येथील नाईक घराण्याची तिसरी पिढी पोहोचली बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:01+5:30

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्यासह आमदार इंद्रनिल नाईक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधाकडे धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून व शेतकऱ्यांना धीर दिला. जुन्या काळात उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके पुसद तालुक्यात येत होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांची पुसदच्या नाईक बंगल्याशी घट्ट नाळ जुळलेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्रीव्दय दिवंगत वसंतराव नाईक व दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे अनेक कार्यकर्ते तालुक्यात होते.

The third generation of the Naik family from Pusad reached the dam | पुसद येथील नाईक घराण्याची तिसरी पिढी पोहोचली बांधावर

पुसद येथील नाईक घराण्याची तिसरी पिढी पोहोचली बांधावर

googlenewsNext
ठळक मुद्देउमरखेड तालुक्यामध्ये नुकसानीची पाहणी क स्थानिक लोकप्रतिनिधींना आत्मचिंतनाची गरज

 अविनाश खंदारे
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. संकटातील शेतकऱ्यांना धीर देण्याच्या उद्देशाने पुसद येथील नाईक घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी व पुसदचे आमदार इंद्रनिल नाईक थेड तालुक्यातील बांधावर पोहोचले. त्यांनी संकटातील शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्यासह आमदार इंद्रनिल नाईक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधाकडे धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून व शेतकऱ्यांना धीर दिला. जुन्या काळात उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके पुसद तालुक्यात येत होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांची पुसदच्या नाईक बंगल्याशी घट्ट नाळ जुळलेली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्रीव्दय दिवंगत वसंतराव नाईक व दिवंगत सुधाकरराव नाईक यांचे अनेक कार्यकर्ते तालुक्यात होते. त्यानंतर माजीमंत्री मनोहरराव नाईक यांनीही परिसरात दांडगा संपर्क कायम ठेवला.
आता तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले आमदार इंद्रनिल नाईक यांनीही पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकत नाईक घराण्याची परंपरा जोपासली. नाईक बंगला तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या सुखदुखात सहभागी होत असल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची लाट उसळली आहे. तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात आमदार नामदेव ससाणे, तर भाजपचेच माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यात अलिकडे बेबनाव झाल्याने भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. या नेत्यांची सामान्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

काँग्रेसमध्ये दुही वाढली, ह्यएकला चलो रेह्णची भूमिका
जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती काँग्रेसचे राम देवसरकर, काँग्रेसचेच पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, असे दोन शिलेदार असताना या पक्षातही मरगळ निर्माण झाली आहे. नेतेमंडळी ह्यएकला चलो रेह्णच्या भूमिकेत वावरत असून दोन्ही सभापती आपापल्या कार्यकर्त्यांचा लवाजमा ठेवून आहे. काँग्रेसमध्ये दुही वाढली असून पक्ष वाढीसाठी कुणालाही सवड नाही. यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनिल नाईक यांनी मात्र जनसंपर्क वाढवत तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. मात्र ऐनवेळी ते दुखात सहभागी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: The third generation of the Naik family from Pusad reached the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.