There was illegal liquor stock under the bankruptcy | देव्हाऱ्याखाली होता अवैध दारूचा साठा
देव्हाऱ्याखाली होता अवैध दारूचा साठा

ठळक मुद्देजांब-वाघाडीतील प्रकार । पदवीधर युवकावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला. ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चक्क देवाºह्याच्या खाली दारूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ४० लिटर दारू एकाच जागेवरून जप्त केली.
सचिन राजू इंगळे (३२) रा. मुलकी यवतमाळ, असे आरोपीचे नाव आहे. सचिनने कला शाखेची पदवी घेतली आहे. शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियनचा कोर्सही केला आहे. त्याने आपले कौशल्या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात वापरले. यवतमाळातील घरात गाळलेल्या दारूचे जांब वाघाडी येथील घरात साठा केला जात होता. येथूनच परिसरातील गावांमध्ये दारू पुरवठा सुरू होता. एखाद्या शुद्ध पाण्याच्या प्लांट प्रमाणे अगदी मोटरपंप लावून दारू नळाद्वारे दिली जात होती. यातील सूत्रधार सचिन इंगळे हा पसार आहे.
सण-उत्सवाचे दिवस जवळ आल्याने ग्रामीण भागात गावठी दारूच्या भट्ट्या पेटल्या आहे. यवतमाळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी दारू गाळप होते. जंगलातील नाल्या काठचा परिसर निवडला जातो. काही ठिकाणी शेतातच दारू गाळली जाते. यावर नियंत्रणासाठी पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे.

अशी लढविली शक्कल
सचिनने जांब वाघाडी येथील घरावर ५०० लिटरची टाकी बसविली. त्या टाकीत दारू साठविली जात होती. त्यातून ही दारू घरातील देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या ४० लिटरच्या ड्रममध्ये येत होती. या ड्रमलाही एक विसर्ग देऊन अंगणातील भूमिगत टाक्यात दारू जमा होत होती. देव्हाºयाखालील टाकीतून दारू काढण्यासाठी कुलरचा पंप वापरला होता. बटन दाबताच बाजूला असलेल्या नळातून दारू येत होती. ठोक व चिल्लर अशा दोन्ही स्वरुपाची विक्री येथून सुरू होती. ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून या अवैध व हायटेक दारू विक्री अड्ड्याचा भंडाफोड केला. कारवाईत ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

खरुला येथे भूमिगत दारूसाठा
गावालगत जमिनीत गाडून ठेवलेल्या दारूचा माग काढत ग्रामीण पोलिसांनी खरूला हे गाव गाठले. तेथे दोघांना अटक केली. आकाश देवीदास शेडमाके (२२), विकास देवीदास शेडमाके (२१) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर देवीदास यशवंत शेडमाके (५५), रोहण रमेश मेश्राम (२०) हे दोघे पसार झाले आहेत. येथे एक लाख १९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.


Web Title: There was illegal liquor stock under the bankruptcy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.