शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती.

ठळक मुद्देलॉकडाऊन व संचारबंदीचा परिणाम । रस्त्यावरील वाहतुकही रोडावली, स्टंटबाजी करणाऱ्यांवर बसला अंकूश

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पोलिसांचे प्रयत्न होऊनही नियंत्रणात न येणाऱ्या दुर्घटनांना लॉकडाऊन तसेच अनलॉकमध्ये आळा बसल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर अपघताची संख्या निम्म्यावर आली असून त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या घटली आहे.यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती. याचाही परिणाम तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावरील अपघातावर दिसून येत आहे. जानेवारी ते जून अखेरपर्यंत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पाच मोठे अपघात झाले. त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.इतर किरकोळ अपघतात सातजण जखमी झाले. मात्र मागील २०१९ मध्ये याच कालावधीचा अपघाताचा व मृत्यूची संख्या अधिक आहे.त्याचप्रमाणे राज्य मार्गावरील अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाणही मागीलवर्षीच्या जानेवारी ते जून २०१९ च्या तुलनेत लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात निम्म्यावर आले आहे.प्रतिवर्षी पावसाळा सुरू होताच अपघाताची मालिका सुरू होते. त्याला रस्त्यावर पडलेले खड्डेच कारणीभूत असतात. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर केवळ रहदारी मर्यादीत असल्याने प्राणांतिक अथवा गंभीर अपघात घडले नाहीत.

टॅग्स :Accidentअपघात