शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार योजनेत ‘हमी’च मिळेना

By admin | Updated: March 1, 2016 02:02 IST

महाराष्ट्र शासनाने काम नसलेल्या हातांना कामाची हमी देण्याच्या उद्देशाने मोठा गाजावाजा करीत रोजगार हमी योजना सुरू केली.

मजुरांना काम नाही : पुसद तालुक्यात कागदोपत्री वाटचालपुसद : महाराष्ट्र शासनाने काम नसलेल्या हातांना कामाची हमी देण्याच्या उद्देशाने मोठा गाजावाजा करीत रोजगार हमी योजना सुरू केली. जॉबकार्ड काढून वर्ष लोटले तरीही रोजगार नाही. या योजनेंतर्गत करण्यात येणारी धरणे, चर, सिंचन कालवे, बांध, शेततळी, खोद विहिरी यासारखी कामे ठप्प आहेत. त्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. पंचायतराज संस्था बळकट करणे हा योजनेचा मूलभूत उद्देश असला तरी त्याला आता तडे जाताना दिसत आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना १५० दिवसांचा रोजगार मिळवून देण्याची हमी देण्याच्या उद्देशाने गावोगावच्या ग्रामपंचायतीद्वारे गावाच्या विकासासाठी ही योजना राबविण्याची शासनाची केवळ वल्गनाच ठरत आहे. या योजनेसंदर्भात कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे कामाची ठोस रूपरेषाच नाही. गावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीद्वारे कागदोपत्री योजना चालू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ही योजना तळागळापर्यंत पोहोचलीच नाही. रोजगाराची हमी देणाऱ्या या योजनेचे जॉबकार्ड काढूनदेखील बरेच मजूर बेरोजगार असल्याची सद्यपरिस्थिती आहे. या योजनेचा मुख्य हेतूने जरी रोजगारनिर्मिती असली तरी गावाच्या विकासासाठी कामगारांची उपलब्धता केल्यास या योजनेतून कोट्यवधी रुपयांची कामे करता येवू शकतात. परंतु काही ठिकाणी शासनाची उदासिनता, चालढकलपणा यामुळे या योजनेचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. या योजनेनुसार कामाची रूपरेषा ६०-४० या प्रमाणात असून ३० टक्के अकुशल म्हणजे मजूर व ४० टक्के कुशल म्हणजे यांत्रिकीकरणाचा वापर करणे अशी पद्धतीची आहे. मात्र गावातील सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, अंतर्गत गटार बांधणी यासाठी कामाची रूपरेषा ८०-२० या प्रमाणात आहे. यामध्ये ८० टक्के यांत्रिकीकरणास मुभा आहे. या योजनेतून पांदण रस्ते करता येतात. मात्र पांदण रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता देणे, प्रशासकीय मान्यता देणे व कामाचा आदेश देणे आदी शासकीय यंत्रणेवर अवलंबून असणाऱ्या बाबी शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे रखडतात. (तालुका प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीतही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष योजना राबवत असताना चौकशीचा ससेमिरा मागे लागून नोकरीवर गदा येईल, अशी मानसिकता येथील शासकीय अधिकाऱ्यांची बनली आहे. या योजनेतून हातात काम मिळत नसल्याने शेतमजुरांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मजुरांच्या हाताला काम नाही, त्यात दुष्काळी परिस्थिती. मजूर कामासाठी बनवत भटकत फिरत आहेत, तर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची चालू असलेली कामे लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे चित्र दिसत आहे.