शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

यवतमाळ : डरकाळी फोडत वाघाने घेतली झेप; पण पंजा अडकला अन्‌ पंढरी बचावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 21:02 IST

नायगाव शिवारातील थरार : नागरिकांची झाली एकच पळापळ

संतोष कुंडकरवणी (यवतमाळ) : तो वाघ बघण्यासाठी शेतात शिरला... यावेळी कुंपणापलीकडे तुरीच्या ओळीत वाघ लपून बसला होता; पण याची तिळमात्र कल्पना त्याला नव्हती. तो वाघाच्या टप्प्यात येताच वाघाने डरकाळी फोडत एका बेसावध क्षणी त्याच्यावर झेप घेतली; परंतु त्याचे दैव बलवत्तर म्हणून वाघाचा पंजा शेताच्या कुंपणात अडकला आणि मोठी दुर्घटना टळली. अंगावर शहारे आणणारा हा थरार शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील नायगाव शेतशिवारात घडला.

पंढरी जीवने असे व्याघ्र हल्ल्यातून बचावलेल्या शेतमजुराचे नाव असून, ते नायगाव (बु.) येथील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून नायगाव (बु.) परिसरात वाघाचा वावर आहे. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नायगाव (बु.) शेतशिवारातील विनोद बोबडे यांच्या शेतात अचानक वाघ शिरला. या वाघाला काहींनी बघितले. पाहता पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नायगाव (बु.) येथील नागरिकांनी वाघ बघण्यासाठी बोबडे यांच्या शेताकडे धाव घेतली. या गर्दीत पंढरी जीवने हादेखील होता. पंढरी मोठ्या हिम्मतीने शेतातील तुरीच्या ओळीकडे सरसावला.

मात्र, शेतात असलेल्या तारेच्या कुंपणापलीकडे तुरीच्या पिकात वाघ बसून होता. याची पुसटशीही कल्पना पंढरीला नव्हती. शेताभोवती जमलेली नागरिकांची संपूर्ण गर्दी वाघ कुठे दिसतो का, याची चाचपणी करीत असताना पंढरी टप्प्यात येताच तुरीजवळ बसून असलेल्या वाघाने पंढरीवर झेप घेतली. मात्र, झेप घेताना वाघाचा पाय कुंपणात अडकला. वाघाने डरकाळी फोडताच एका क्षणात नागरिकांची पळापळ सुरू झाली. पंढरी जीवने यानेदेखील तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वणी येथून वनविभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकालादेखील तेथे वाघ दिसला. त्यानंतर तेथून हुसकावून लावले. 

नायगाव (बु.) शेतशिवारात वाघ असल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे एक पथक रवाना केले. या पथकालादेखील तेथे वाघ दिसून आला. मात्र, शेतमजुरावर वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केला, याबाबत कोणतीही माहिती नाही. वाघाला तेथून हुसकावून लावण्यात आले आहे.गणेश महांगडे,आरएफओ, वणी.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ