मुलांच्या चांगल्या भवितव्याचं स्वप्न.. आणि अपहरण ! मजुराची तीन मुले तेलंगणाला पळविण्याची धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:59 IST2025-09-26T13:58:35+5:302025-09-26T13:59:08+5:30
मुलांना तेलंगणात नेल्याची शंका : आरोपीविरुद्ध मारेगाव ठाण्यात गुन्हा

The dream of a better future for children.. and kidnapping! Shocking incident of a laborer's three children being abducted to Telangana
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव (यवतमाळ): सालगडी म्हणून काम करणाऱ्या आणि शेतातच वास्तव्याला असलेल्या मजुराच्या तीन मुलांचे एकाचवेळी अपहरण करण्यात आल्याने मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुलांना चांगले शिक्षण देतो, असे मजुराला आश्वासन देऊन सध्या तेलंगणामध्ये वास्तव्याला असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीने ही मुले पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली. २३ सप्टेंबरला याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत मुलांचे सावत्र वडील लक्ष्मण गोमा मारेगाव (यवतमाळ): सालगडी म्हणून काम करणाऱ्या आणि शेतातच वास्तव्याला असलेल्या मजुराच्या तीन मुलांचे एकाचवेळी अपहरण करण्यात आल्याने मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुलांना चांगले शिक्षण देतो, असे मजुराला आश्वासन देऊन सध्या तेलंगणामध्ये वास्तव्याला असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीने ही मुले पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली. २३ सप्टेंबरला याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत मुलांचे सावत्र वडील लक्ष्मण गोमा सालगडी म्हणून शेतात वास्तव्याला आहेत. ओळखीचा फायदा घेऊन आरोपी वडगाव येथे आला व मुलांच्या आई-वडिलांना मी तुमच्या मुलांचे चांगले पालन पोषण करतो व शिक्षणही देतो, असे सांगून १९ सप्टेंबरच्या सायंकाळी एक मुलगी व दोन मुलांना घेऊन गेला.
२० सप्टेंबरला मुले कशी राहतात म्हणून लक्ष्मण टेकाम यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला असता, आरोपीचा फोन बंद असल्याचे दिसून आले. वारंवार फोन लावूनही फोन लागत नसल्याने मुलांच्या आईने निशाणघाट येथे आरोपीच्या घरी जाऊन मुलांचा शोध घेतला असता, मुले व आरोपी आढळून आले नाहीत. त्यानंतर तेलंगणातून परत आल्यानंतर मुलांच्या सावत्र वडिलानी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी देवीदास वावरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस पथक रवाना
तक्रार प्राप्त होताच, मारेगाव पोलिसांचे पथक तेलंगणा येथे पाठविण्यात आले असून तेलंगणा पोलिसांच्या मदतीने आरोपी व तीन मुलांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अजून आरोपीचा सुगावा लागला नाही, अशी माहिती मारेगाव पोलिसांनी दिली.