वळणावरच झाला घात, अपघातात युवती ठार; कारचा चुराडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:23 IST2023-01-12T14:22:28+5:302023-01-12T14:23:17+5:30
दोघे जखमी, सोनवाढोणा येथे अपघात

वळणावरच झाला घात, अपघातात युवती ठार; कारचा चुराडा
यवतमाळ : ट्रक यवतमाळकडून नेरकडे जात होता, तर कार यवतमाळकडे येत होती. या दोन वाहनांत अगदी वळणावरच धडक झाली. या घटनेत युवती ठार झाली तर दोन जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास सोनवाढोणा गावाजवळच्या वळणावर घडली.
आचल दयानंद निनावे (१९, रा. बोरगाव लिंगा) असे मृत युवतीचे नाव आहे. करण प्रमोद निळवे (१५) व साक्षी खरवडे (रा. यवतमाळ) हे दोघे जखमी आहेत. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(एमएच २७ एक्स ७२००) या क्रमांकाचा ट्रक नेरकडे जात होता, तर (एमएच ०६ एएन ५९८२) या क्रमांकाची कार यवतमाळकडे येत होती. कारमध्ये चालकासह चार जण होते. ट्रकच्या धडकेत या कारचा अक्षरश: चुराडा झाला. आचल निनावे हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद लाडखेड पोलिसांनी घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.