शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नेरच्या नराधमाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:01 PM

अल्पवयीन मुलगी घराकडे जात असताना नराधमाने तिचे अपहरण करून सलग सहा दिवस अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारवासाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देअपहरण व अत्याचार : पीडितेची साक्ष निर्णायक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अल्पवयीन मुलगी घराकडे जात असताना नराधमाने तिचे अपहरण करून सलग सहा दिवस अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारवासाची शिक्षा ठोठावली.गजानन देवराव राठोड (२२) रा. फुकटनगर नेर, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २७ जून २०१६ रोजी सकाळी ११ वाजता नेर येथील पीडित मुलगी वटफळी येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी जात होती. तिला नेरच्या शासकीय रुग्णालयाजवळ अडवून गजानन राठोडने तिचे अपहरण केले. आरोपीने तिला अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील लेहगाव येथे नेले. तेथे त्याने सलग सहा दिवस तिच्यावर अत्याचार केला. पीडितीने त्याच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केल. मात्र त्यात ती अपयशी ठरले. अखेर २ जुलै २०१६ रोजी पीडित मुलीने त्याच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून नेर गाठले.नेर येथे घरी परत आल्यानंतर आई-वडिलांसमोर तिने आपबिती कथन केली. नंतर पालकांसह थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार सादर केली. पीडितेच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी अपहरण, अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गजाननविरूद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय गराड यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांनी या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलीची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. पीडितेची ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी गजानन राठोड याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहायक सरकारी वकील अरुण मोहोड यांनी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश मेश्राम यांनी सहकार्य केले.