शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

दूरसंचार विभागाचे पोल कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 9:34 PM

दूरसंचार क्षेत्रा देशपातळीवर पूर्वीपासून कार्यरत असलेल्या बीएसएनएलची मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा आॅप्टीक फायबर केबलचा शोध नव्हता. त्या काळात लोखंडी पोल व तारांच्या माध्यमातून फोनची जोडणी देण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेलिफोन फोन दिसत होते. ग्रामीण नेटवर्क पोहोचविण्यासाठी याचाच वापर केला जात होता.

ठळक मुद्देमालमत्ता इतरांच्या वापरात : शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणा वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दूरसंचार क्षेत्रा देशपातळीवर पूर्वीपासून कार्यरत असलेल्या बीएसएनएलची मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा आॅप्टीक फायबर केबलचा शोध नव्हता. त्या काळात लोखंडी पोल व तारांच्या माध्यमातून फोनची जोडणी देण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेलिफोन फोन दिसत होते. ग्रामीण नेटवर्क पोहोचविण्यासाठी याचाच वापर केला जात होता. बदल्या तंत्रज्ञानाने ही संपूर्ण यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलची मालमत्ता सर्वत्र विखुरली आहे. अनेक ठिकाणेच पोल, तार गायब झाल्या आहेत. तर शहरामध्ये टलिफोन पोलचा वापर हा केबलवाले करत आहेत. यातून बीएसएनएलला कोणतेच भाडे मिळत नाही.माहिती तंत्रज्ञामध्ये सातत्याने आमूलाग्र बदल होत आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सुरूवातील लॅन्ड लाईन फोनचा वापर हा आॅपरेटरच्या माध्यमातून करावा लागत होता. याला ट्रंक कॉल देखील संबोधले जात होते. त्यानंतर घरच्या लॅन्ड लाईन फोनवरून थेट कॉल मिळत होता. पूर्वी फोन हा काही ठराविक घरातच दिसत असे, त्यानंतर बीएसएनएलने गावागावात नेटवर्क पोहोचविण्यासाठी आॅप्टीक फायबर केबल टाकणे सुरू केले. या काळात मोबाईल महानगरापूरताच मर्यादित होता. दरम्यान नेटवर्क कव्हरेज वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू होते. सरकारच्या अधिपत्याखालील कंपनीने आपल्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. मोबाईल येताच टॉवर उभारणी केली. या सर्व बदलत्या तंत्रज्ञानाने टेलिफोन पोल व तारा दुर्लक्षित झाल्या. या पोल व तारा गोळा करण्यासाठी येणारा खर्च हा त्याच्या आजच्या बाजार भावापेक्षा अधिक असल्याचे दूरसंचार विभागातील एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जुन्या मालमत्तेबाबतचा निर्णय हा दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात घेतला जातो. त्यामुळे यावर अजूनपर्यंत तरी कोणतेच धोरण ठरलेले नसल्याचे सांगण्यात आले. कधीकाळी गल्लीबोळात लागलेले टेलिफोन पोल आता इतरांकडून वापरले जात आहे. वाहिन्यांच्या केबल चालकांनी याचा पुरेपूर उपयोग केला आहे. तर काही ठिकाणचे पोल हे अनेकांनी इतरत्र काढून लावले आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएल