शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी नितीनची प्रेरणादायी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

नितीन एक वर्षाचा असताना आजारी पडला. पालकांनी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी आजार दुरुस्त होण्याऐवजी नितीन संपूर्ण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्याचे एक हात आणि दोन पाय निकामी झाले. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्यापुढील समस्या वाढत गेल्या. खाणे, पिणे, चालणे या सर्व कृती करताना होणारा त्रास त्याला असह्य होत होता.

ठळक मुद्देपिंपळगावचा युवक : कृत्रिम हातापायावर सोडवितो रोजीरोटीचा प्रश्न

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : धडधाकट असूनही दारोदार फिरून भीक्षा मागणारे आणि रोजगार नसल्याचे रडगाने सांगणारे माणसं आज सर्वत्र दिसतात. मात्र पिंपळगाव डुब्बा येथील नितीन विठ्ठल दाबेकर या २६ वर्षीय युवकाची धडपड प्रेरणादायी अशी आहे. एक हात आणि दोन पाय कृत्रिम असतानाही जगण्याचा खरा मंत्र त्याने दिला आहे.नितीन एक वर्षाचा असताना आजारी पडला. पालकांनी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी आजार दुरुस्त होण्याऐवजी नितीन संपूर्ण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्याचे एक हात आणि दोन पाय निकामी झाले. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्यापुढील समस्या वाढत गेल्या. खाणे, पिणे, चालणे या सर्व कृती करताना होणारा त्रास त्याला असह्य होत होता.जगण्याची धडपड आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याने निवडलेला मार्ग प्रत्येक दिव्यांग आणि धडधाकटांसाठी ऊर्जेचा स्रोत बनला आहे. कृत्रिम हात-पाय बसविले. यातून त्याची स्वाभिमानाने जगण्याची उमेद बळावली. पिंपळगावात राहूनच तो सुतार काम करतो. लाकडापासून विविध शेतीपयोगी वस्तूला आकार देतो.कुटुंबाची साथविवाहित असलेल्या नितीनचा मुलगा, मुलगी असा चार जणांचा परिवार आहे. नियतीने लादलेले अपंगत्व त्याच्यासाठी दु:खाची बाब आहे. मात्र जिद्द आणि चिकाटीची साथ आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मिळत असलेले पाठबळ ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. आयुष्यातील पावलोपावली येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कुटुंबीयाकडून मिळणारी साथच त्याची ताकद बनली आहे. नितीनची वाटचाल इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे.