शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

यवतमाळातील दोन युवकांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय एसपीला सर्वोच्च न्यायालयाची अवमानना नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 2:37 PM

शैलेश ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकारी तथा एसपींना अवमानता नोटीस जारी केली आहे. 

यवतमाळ : यवतमाळात २००३मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेल्या दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणात घाटंजी येथील शैलेश ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकारी तथा एसपींना अवमानता नोटीस जारी केली आहे. याचिकाकर्ते शैलेश ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. परंतु सीबीआयने खुनाचा गुन्हा न नोंदविता फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.गेल्या वर्षभरात या प्रकरणात नेमकी काय प्रगती झाली, याची माहिती सीबीआयकडून याचिकाकर्त्याला दिली गेली नाही. म्हणून ठाकूर यांनी सीबीआयच्या तपास अधिका-याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. याची दखल घेऊन न्या. उदय ललित, न्या. संजय कौल यांनी ३ मे २०१९ रोजी सीबीआयचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी नंदकुमार नायर यांना अवमानना नोटीस बजावली आहे. प्रकरणाच्या संपूर्ण कागदपत्रांसह व्यक्तिश: हजर राहून प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणातील संबंधित तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर याचिकेप्रमाणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खुनाचा गुन्हा नोंदविला जावा, अशी शैलेश ठाकूर यांची मागणी आहे.२००३ मध्ये धामणगाव रोडवरील एका दरोडाप्रकरणी अजय मोहिते व सुरेश सोनकुसरे या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या ताब्यात असतानाच या संशयास्पदरीत्या युवकांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचे सांगत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका ठाकूर यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आले. सकृतदर्शनी दोष दिसत असल्याने खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते.

टॅग्स :Courtन्यायालय