शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित गुटख्याचा अकोल्यातून पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात्र’ ठरवित प्रतिबंधित गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. प्रतिबंधित गुटख्याचे केंद्र सध्या अकोल्यात आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भ : शिवणगावात कोट्यवधीच्या गुटख्याचा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने प्रतिबंध घातला असलेल्या गुटख्याचे पश्चिम विदर्भाचे मुख्य केंद्र अकोल्यात स्थिरावले आहे. तेथील शिवणगावात कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याचा साठा विविध गोदामांमध्ये करण्यात आला आहे.तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात्र’ ठरवित प्रतिबंधित गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. प्रतिबंधित गुटख्याचे केंद्र सध्या अकोल्यात आहे. तेथून पोलीस परिक्षेत्राच्या यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अकोला या पाच जिल्ह्यातील सूत्रे हलविली जातात. इंदोरवरून गुटख्याचा तयार माल अकोल्यातील शिवणी येथे आणला जातो. तेथे भाड्याने विविध गोदामे घेण्यात आली आहे. या गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आला आहे.पश्चिम विदर्भातील ‘गुटखा किंग’‘विमल’ नावाने या प्रतिबंधित गुटख्याचा ब्रॅन्ड सर्वत्र पोहोचविला जातो. ‘दिलीप’ हा या गुटख्याचा पश्चिम विदर्भातील किंग मानला जातो. त्याच्यावतीने ‘श्याम’ हा या सर्व गुटख्याचा कारभार पाहतो. बुलडाणा, खामगाव, अमरावती, मूर्तीजापूर, अकोला, वाशिम, कारंजा, यवतमाळ, आर्णी, घाटंजी अशा विविध ठिकाणी या गुटख्याची गोदामे असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणावरील गुटखा तस्कर, पुरवठादार व विक्रेत्यांची वेगळी ‘साखळी’ निर्माण झाली आहे. यवतमाळात ‘फिरोज’ हा या साखळीतील प्रमुख घटक आहे. त्याच्या माध्यमातून अकोल्यातील गुटख्याच्या या ब्रँडचा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पुरवठा केला जातो.इंदोर ते शिवणी थेट ‘कनेक्शन’कुठे पोलीस व अन्न औषधी प्रशासनाला हाताशी धरुन तर कुठे त्यांची नजर चुकवून अकोला जिल्ह्यातील शिवणीतून गुटखा पोहोचविणारी वाहने निघतात. कधी दिवसात तर कधी रात्रीच्या वेळी संधी साधून हा गुटखा पश्चिम विदर्भात सर्वत्र पोहोचविला जातो. त्यातील मासिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. इंदोर ते शिवणी हे गुटख्याचे प्रमुख कनेक्शन आहे. शिवणीवरून हा गुटखा कोणत्ळाही शासकीय अडथळ्याशिवाय सर्वत्र पोहोचतो.आर्थिक उलाढालीत अनेक ‘वाटेकरी’गुटखा तस्करीतील कोट्यवधींच्या या उलाढालीत अनेक ‘वाटेकरी’ असल्याचे सांगितले जाते. आम्हाला कारवाईचे अधिकार नाही असे म्हणून पोलीस हात वर करतात. तर आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, असे सांगून कारवाईचे अधिकार असलेले अन्न व औषधी प्रशासन वेळ मारुन नेतात. त्याचाच फायदा घेऊन गुटखा तस्करांनी पाचही जिल्ह्यात आपले साम्राज्य उभे केले आहे.एफडीए, पोलीस महानिरीक्षकांपुढे आव्हानअकोल्यातून पाचही जिल्ह्यात गुटख्याचे नेटवर्क भक्कमपणे उभे करण्यात आले असून त्याचे आव्हान अन्न औषधी प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांपुढे आहे. अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापुढेही या अकोल्याच्या गुटखा तस्कराने खुले आव्हान उभे केले आहे.दिलीप व श्याम तस्करीचे मुख्य सूत्रधारदिलीप व श्याम हे या गुटखा तस्करीचे प्रमुख सूत्रधार आहेत. यापूर्वी अकोला जिल्हा पोलिसांच्या ते रेकॉर्डवरही आले आहेत. मात्र न्यायालयातून जामीन मिळवून ते बाहेर राहिले. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनीही फारसी धडपड केल्याचे ऐकिवात नाही. अप्रत्यक्ष त्यांना अटकपूर्व जामिनासाठी पुरेशी संधी दिली गेली. पोलिसांच्या या पाठबळामुळेच दिलीप व श्याम यांची हिंमत वाढली आहे. यातूनच त्यांनी आपले ‘विमल’ गुटखा तस्करीचे नेटवर्क पाचही जिल्ह्यात सर्वदूर वाढविले आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी