विहिरीत उडी घेऊन तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 14:52 IST2020-12-13T14:51:38+5:302020-12-13T14:52:21+5:30
पोलीस पाटील गजानन मुलंगे यांनी उमरखेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार संजय चोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भाऊ पांचाळ तपास करीत आहे.

विहिरीत उडी घेऊन तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या
विडूळ (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील तरुण व्यापाऱ्याने आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. योगेश दीपक मुक्कावार (वय ४०) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी देवसरी रोडलगत असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
पोलीस पाटील गजानन मुलंगे यांनी उमरखेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार संजय चोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भाऊ पांचाळ तपास करीत आहे. वृत्त लिहिस्तोवर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. योगेश मुक्कावार यांच्या निधनामुळे रविवारी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली.