शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार सिंचन विहिरींच्या निर्मितीचा मार्ग सुकर

By admin | Updated: November 18, 2014 23:03 IST

शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने

यवतमाळ : शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने या विहिरी रखडल्या. आता जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी विहिरींच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून, त्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या आहे. त्यामुळे या विहिरी पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करून २०१४ मध्ये १४ हजार धडक सिंचन विहिरी जिल्ह्यात निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने आणि तांत्रिक अडचणी आल्याने पात्र लाभार्थ्यांची नावे घोषित होण्यास विलंब झाला. परिणामी सिंचन विहिरींचे कामच रखडले. त्यामुळे या विहिरी पदरात पडतील अशी अपेक्षाच शेतकरी वर्गाने सोडून दिली होती. दरम्यान याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी प्रगतीपथावरील पात्र लाभार्थ्यांच्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली. ऐवढेच नव्हे तर पात्र लाभार्थ्यांच्या याद्यासुद्धा तलाठी, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, तहसीलदार, पंचायत समिती आदी ठिकाणी लाभार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. पात्र लाभार्थ्यांनी विहिरी पूर्णत्वास नेण्यासाठी रोजगार हमी योजनेचे ई-मस्टर यंत्रणेकडून प्राप्त करून घ्यावे आणि विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करावी. पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी महिवाल यांनी कळविले आहे. त्यामुळे आता धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत रखडलेल्या विहिरी पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. (स्थानिक प्रतिनिधी)