शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाने फुगलेला अर्थसंकल्प

By admin | Updated: February 25, 2015 02:18 IST

नगरपरिषदेने २०१४ - १५ यावर्षाचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१५-१६ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.

यवतमाळ : नगरपरिषदेने २०१४ - १५ यावर्षाचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१५-१६ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. १०३ कोटींच्या अंदाजपत्रकात प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा शासकीय अनुदानाचीच वाढीव गोळाबेरीज करण्यात आली आहे. खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी येणाऱ्या अनुदानाचे आकडे फुगविण्यात आले आहेत. आठवडी बाजार आणि दैनिक बाजार वसुलीच्या उत्पन्नातही अशीच तफावत आहे. शासकीय अनुदानातून प्राप्त होणाऱ्या रकमेत राष्ट्रीय मत्स्यीकी विकास अनुदान थेट दोन कोटी दाखविण्यात आले आहे. यापूर्वी ५० लाखांपैकी केवळ १८ लाख मिळाले आणि ३१ लाख येतील असे दाखविण्यात आले आहेत. नगरपरिषद हद्दवाढ वाढीव क्षेत्र विकास कामांचे एक कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच प्रमाणे बांधकाम शुल्कातही घसघशीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. शासनाकडून अनुदाने व अंशदानापोटी २२ कोटी ३४ लाख २७ हजार मिळतील असे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे बजेटमध्ये नगराध्यक्षांच्या अधिकारातील आकस्मिक निधी खर्चाला कात्री लावत २० लाखावरून १५ लाख करण्यात आले आहे. स्वच्छता अभियानाची तरतूद ३० लाखावरून आठ लाख इतकीच करण्यात आली आहे. आकस्मिक पाणी पुरवठ्याच्या बजेटमध्ये तब्बल दहा पटीने वाढ करीत दोन लाखावरून थेट १२ लाखाची तरतूद केली आहे. वीज बिलचा खर्चही २५ लाखावरून एक कोटी होईल असे दाखविण्यात आले आहे. संगणक खरेदीसाठी नव्याने दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी मंजूर केलेल्या दहा लाखांपैकी केवळ नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत दोन लाख खर्च झाल्याचे दाखविले आहे. अनेक योजनांवर प्रस्तावित निधीच खर्च झालेला नाही. अर्थसंकल्पातील तूट लक्षात येऊ नये यासाठी पध्दतशीरपणे आकडेमोड करण्यात आली आहे. यावर २६ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदस्य काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)