शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पडला मैदानी खेळांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वी पासूनच आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने व्यायाम तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपले मन आणि तन अ‍ॅक्टिव्ह राहते, असे जुने जाणते लोक सांगतात. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सगळे विसरून जाऊन विद्यार्थी व तुरण केवळ ऑनलाईन राहण्यावर जोर देत आहे.

ठळक मुद्देमोबाईलचे युग : ऑनलाईन खेळांकडे जादा कल, अतिवापराने आजाराची भीती

उदय पुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : आजचे युग हे संगणक तसेच मोबाईल युग म्हणून ओळखले जाते. या डिजिटल युगात सगळेच अपल्याला पटकन आणि जागेवर मिळत असल्याने मैदानी खेळांचा विद्यार्थी तसेच तरुणांना विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वी पासूनच आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने व्यायाम तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपले मन आणि तन अ‍ॅक्टिव्ह राहते, असे जुने जाणते लोक सांगतात. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सगळे विसरून जाऊन विद्यार्थी व तुरण केवळ ऑनलाईन राहण्यावर जोर देत आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होती. त्यामुळे खेळण्यासाठी जागा शोधण्याची गरज नव्हती. मात्र आता तशी स्थिती राहिली नाही. सर्वत्र सिमेंटचे जंगल उभे झाले आहे. या युगात मैदानासाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे खेळायचे कोठे, हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक जण आता मोबाईलवेडा झाला आहे. मात्र मोबाईलला चिकटलेल्या पिढीला त्या पासून दूर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भविष्यात सहन करावे लागण्याची शक्यता आहे. जादा प्रमाणात मोबाईल तसेच संगणकाचा वापर केल्याने मान, डोळे, पाठीचा कण्यावर परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात.मानसिक आरोग्यावर परिणामऑनलाईन खेळांमुळे मानसिक आरोग्यसुद्धा ढासळण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरून विद्यार्थी व तरुणांनी पुन्हा मैदानी खेळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा नवी पिढी पारंपरिक खेळ विसणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक