शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

राज्यातील आदिवासी तरुणी सांभाळणार आता ‘एसटी’चे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:38 PM

जिल्ह्यात डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी आडवळणावरील पोडावर राहणाऱ्या आदिवासी तरुणी लवकरच ‘एसटी’ बस चालविताना दिसणार आहे.

ठळक मुद्दे२३ महिला चालकयवतमाळातूनच राबविला जातोय अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी आडवळणावरील पोडावर राहणाऱ्या आदिवासी तरुणी लवकरच ‘एसटी’ बस चालविताना दिसणार आहे. मुंबई येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात २३ तरुणींना बसचालकपदी विराजमान करण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 'राष्ट्र कृतज्ञता दिवस' रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ना. विष्णू सावरा, ना. संजय राठोड आदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तरुणी, महिलांना एसटी चालक म्हणून नियुक्ती दिली.आदिवासी मुली गाव, पोड, घराबाहेर पडाव्या म्हणून एसटी महामंडळात चालक म्हणून नियुक्ती देण्याची संकल्पना ना. संजय राठोड यांनी ना. दिवाकर रावते यांच्यासमोर मांडली. यवतमाळ जिल्ह्यापासूनच या उपक्रमाची सुरवात करू असे सांगत कामाला लागण्याचे आदेश ना. राठोड यांना दिले. शैक्षणिक पात्रता पडताळून तरुणींना या उपक्रमासाठी निवडण्यात आले. मुंबई येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना रवाना केले. मुंबईतील सोहळ्यात या २३ तरुणींना वाजतगाजत मंचावर आणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. एप्रिलपासून प्रशिक्षण सुरू होऊन या तरुणी दिवाळीपर्यंत बसेसच्या स्टेअरिंगवर प्रत्यक्ष दिसणार असल्याचे ना. रावते यांनी यावेळी सांगितले.मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी समाजातील तरुणींना थेट चालक पदासाठी निवडून ना. संजय राठोड यांनी आम्हाला पोडावरून थेट विकासाच्या महामार्गावर आणले, अशी प्रतिक्रिया या प्रक्रियेतील तरुणी अंजुताचे वडील इलाहाबाद भोसले यांनी दिली. परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि ना. संजय राठोड यांनी एसटीचे स्टेअरिंग आमच्या हाती देण्याचा निर्णय घेऊन मोठा विश्वास टाकला, तो सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया शीतल रमेश पवार या तरुणीने व्यक्त केली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ