शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

ब्लास्टिंगचे दगड शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM

या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत. स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजुबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या खरिप हंगामाची कामे शेतामध्ये सुरू आहे. मजुरासह स्वत: शेतमालकदेखिल त्यासाठी शेतात राबत आहे.

ठळक मुद्देघोन्सा कोळसा खाण : दिवसा केले जातात स्फोट, शेतकरी-मजुरात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील घोन्सा खुल्या कोळसा खाणीत उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगनंतर मोठमोठे दगड परिसरातील शेतांमध्ये जाऊन पडत आहेत. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत. स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजुबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या खरिप हंगामाची कामे शेतामध्ये सुरू आहे. मजुरासह स्वत: शेतमालकदेखिल त्यासाठी शेतात राबत आहे. त्यातच आता लगतच्या कोळसा खाणीत ब्लास्टिंग केली जात असल्याने शेतात येऊन पडणाऱ्या दगडांमुळे शेतकरी, शेतमजुर भयभीत झाले आहे. खाणीला लागूनच वणी-घोन्सा मार्गावर एक कॉन्व्हेंटदेखिल आहे. ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वेकोलिद्वारे स्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटाची तिव्रता इतकी होती, की स्फोटानंतर खाणीतील मोठमोठे दगड या कॉन्व्हेंटसमोर येऊन पडले. एवढेच नव्हे, तर लागुनच असलेल्या डॉ.जानराव ढोकणे यांच्या शेतातदेखिल दगडांचा खच पडला. याचवेळी या शेतात मजूर काम करित होते. स्फोटानंतर दगड येऊन पडताच या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला. यासंदर्भात परिसरातील गावकऱ्यांनी वेकोलिला वारंवार सूचना देऊनही वेकोलिकडून मुजोरपणे दिवसाढवळ्या स्फोट घडविले जात असल्याचा आरोप आहे.एसडीओंकडे तक्रारनियमानुसार सुरक्षेची काळजी घेऊन स्फोट घडविणे आवश्यक असताना, अशी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने संबंधित वेकोलिच्या अधिकाऱ्यांविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉ.जानराव ढोकणे यांनी वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Blastस्फोटagricultureशेती