शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
4
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
5
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
6
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
7
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
8
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
9
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
10
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
11
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
12
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
13
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
14
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
15
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
16
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
17
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
18
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
19
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
20
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर

एसटी दरीत कोसळताना वाचली; ५० प्रवासी थोडक्यात बचावले

By विशाल सोनटक्के | Published: May 04, 2024 1:41 PM

महामार्गचे होतेय दुर्लक्ष : नांदगव्हाण घाटात चार दिवसात तिसरा अपघात

यवतमाळ : एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस दरीत कोसळताना वाचली. त्यामुळे ५० प्रवासी थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नांदगव्हाण घाटात ही घटना घडली. अपघातानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने एसटी बसला आधार देण्यात आला तेवढ्या वेळात प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन पूल अपघातक्षेत्र बनले आहे. चार दिवसांत याठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झाला आहे.

हदगाव (जि. नांदेड) येथून एसटी बस क्रमांक (एमएच २०, बीएल १६०५) ही बस ५० प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. विशेष म्हणजे मागील चार दिवसांतील नांदगव्हाण घाटातील हा तिसरा अपघात असून, दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता. त्यातील अपघातग्रस्त ट्रक अजूनही बाजूला करण्याचे सौजन्य महामार्ग पोलिसांनी दाखवलेले नाही.

 

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालक