शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

करारावरील अधिकाऱ्यांवर ‘एसटी’ची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:34 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने करारावर नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केली.

ठळक मुद्देविविध पदांसाठी मोजले कोट्यवधीनियुक्तीत तरतुदीचा भंग

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने करारावर नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केली. महाव्यवस्थापक ते दुय्यम अभियंत्यांवर तरतुदीचा भंग करून कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. वर्षभरात जे काम केवळ दोन लाख ९३ हजार रुपये खर्चात झाले असते, त्यासाठी एक कोटी १८ लाख १० हजार रुपये मोजण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्यांना कराराच्या बाहेर जाऊन सुविधा देण्यात आल्या.मागील वर्षभरात एसटीने १६ जणांना करारावर नियुक्ती दिली. यातील काही जणांची सेवा खंडित करण्यात आली, तर काही जणांचा कराराचा कालावधी संपला. आठ जण अजूनही कार्यरत आहेत. महाव्यवस्थापक (कर्मचारी व औद्योगिक संबंध) या पदावर माधव काळे यांना दोन वर्षांसाठी करारावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यांना दरमहा एक लाख २५ हजार रुपये वेतन दिले जात होते. त्यांची मुदतवाढ खंडित करण्यात आली. आता त्यांच्या पदाचा कार्यभार सोपविलेल्या अधिकाऱ्याला दरमहा केवळ १५०० रुपये अतिरिक्त मंजूर करण्यात आले आहे. अर्थातच जे काम केवळ १८ हजार रुपयात होत होते, त्यावर १५ लाख रुपये मोजले.उपमहाव्यवस्थापक (नियोजन व पणन) या करारावरील नियुक्त अधिकाऱ्यांला दरमहा ७५ हजार रुपये वेतन देण्यात आले. त्यांच्या कराराची मुदत संपली. एसटी त्यांच्यावर नऊ लाख रुपये खर्चून ‘बसली’ आहे. आता त्याच कामासाठी केवळ १८ हजार रुपये खर्च केले जात आहे. उपमहाव्यवस्थापक (प्रशिक्षण) यांच्यावरही नऊ लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय मुख्य कामगार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय अभियंता, विभाग नियंत्रक, शाखा अभियंता, लेखा अधिकारी, लेखा परिक्षक, दुय्यम अभियंता यांना २५ हजार ते ५० हजार एवढे मासिक वेतन देण्यात आले, कार्यरत असलेल्यांना दिले जात आहे.बेकायदेशीर निर्णय घेतल्याची ओरडएक कोटी १८ लाख दहा हजार रुपये पगारावर खर्च करून महामंडळ थांबले नाही, तर प्रवासखर्च, भत्ते आदी खर्च देण्यात आला. यातील काही अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर निर्णय घेतल्याची ओरड आहे. एसटीच्या फायद्याचे म्हणून या लोकांवर जबाबदारी टाकण्यात आली. प्रत्यक्षात मागील चार वर्षात संचित तोटा सहा हजार कोटींवर पोहोचला आहे. करार पद्धतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना एसटी प्रती आस्था, बांधिलकी, जबाबदारी नाही. याचाच परिणाम एसटीला भोगावा लागत असल्याचे सांगितले जाते.न्यायालयात जाण्याची तयारीकरार पध्दतीने नियमित पदांवर बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्यात याव्या. भविष्यात अशा पध्दतीने नियुक्ती करू नये. करार पध्दतीने नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. अन्यथा न्यायालयात जावे लागेल, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटी