शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली. हे सोयाबीन अती पावसाने बहुतांश भागात कुबेरले आहे. थोडेबहुत वाचलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जाणार आहे. यानंतरही खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तीन हजारांपर्यंत खाली आले आहे.

ठळक मुद्देशासकीय केंद्र उघडलेच नाही : चार हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन तीन हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना बाजारपेठेतही दर घसरण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. खुल्या बाजारात सोयाबीन येण्यापूर्वीच शेतमालाचे दर घसरले आहे. यामध्ये एक हजार रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली. हे सोयाबीन अती पावसाने बहुतांश भागात कुबेरले आहे. थोडेबहुत वाचलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जाणार आहे. यानंतरही खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तीन हजारांपर्यंत खाली आले आहे.यवतमाळसह जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरातील घसरण पाहायला मिळत आहे. जुन्या सोयाबीनला तीन हजार ५०० ते तीन हजार ९०० प्रती क्विंटलचा दर मिळत आहे, तर नवीन सोयाबीनला तीन हजार ते तीन हजार २०० असा दर आहे. यामुळे शेतकºयांना लागवड खर्चही निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने हमी दर जाहीर केले. मात्र हमी केंद्र अद्यापही उघडले नाही. यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला आहे. याठिकाणी एमएसपीच्या खाली शेतमालाची खरेदी होत आहे. शासकीय बाजार समिती आणि खासगी बाजार समिती या दोनही ठिकाणी शेतकºयांना दर घसरणीचा सामना यावर्षी करावा लागणार आहे.काळपट पांढरे सोयाबीनकोंब फुटल्याने अनेकांना सोयाबीन घरातही आणता आले नाही. अर्ली व्हेरायटी लागवड केलेल्या शेतकºयांना या नुकसानीचा फटका बसला. यासोबतच ३३५ सारख्या नव्या वाणालाही नुकसानीचा सामना करावा लागला. आता वाचलेल्या सोयाबीनमध्ये काळपट आणि पांढरे डाग पाहायला मिळत आहे. यामुळे हे सोयाबीन बिजोत्पादनासाठीही कमकुवत असण्याची शक्यता आहे. यातून तेल आणि ढेप याची गुणवत्ता कमी प्रतीची राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती