मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:30+5:30

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज सुरू करावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवून बांधकामाला गती द्यावी, ........

Solve various issues of the Maratha community | मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा

मराठा समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावा

googlenewsNext
ठळक मुद्देसमन्वय समितीचे शिष्टमंडळ प्रशासनाला भेटले : सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मराठा समाजाच्या प्रमुख आणि महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, अपवाद वगळता कधी बैठक घेण्यात आलेली नाही, असे नमूद करून मराठा समाजाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज सुरू करावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवून बांधकामाला गती द्यावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजनेची अंमलबजावणी करावी, आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी न घेता न्यायालय पूर्णपणे सुरू होईल तेव्हा प्रत्यक्ष घेण्यात यावी, आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करणाºया वकीलांना सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी करून घ्यावे आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
समितीच्यावतीने शिवक्रांती सेना महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष गजानन वानखडे, शिक्षण सेना जिल्हाध्यक्ष रवींद्र कोल्हे, संजू भितकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशीष खडसे, वाहनचालक मालक संघटनेचे राजू बोईनवार, अपंग सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय ढोरे, बाभूळगाव तालुका अध्यक्ष श्रीकांत महल्ले आदींच्या स्वाक्षºयानिशी निवेदन देण्यात आले.

Web Title: Solve various issues of the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.