शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

छोटे व्यावसायिकही आता सावकारांच्या जाळ्यात

By admin | Updated: March 11, 2015 01:57 IST

तालुक्यात सध्या अवैध सावकारांनी सुशिक्षित बेरोजगार व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपले लक्ष्य केले असून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आहे.

उमरखेड : तालुक्यात सध्या अवैध सावकारांनी सुशिक्षित बेरोजगार व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपले लक्ष्य केले असून त्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आहे. याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने अवैध सावकारीचा व्यवसाय चांगलाच भरभराटीस आल्याचे दिसून येते.तालुक्यातील ढाणकी, मुळावा, पोफाळी, विडूळ, बिटरगाव, दराटी, ब्राह्मणगाव आणि उमरखेड शहर या ठिकाणी छोट्या व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतलेले व्यावसायिक आता सावकारांच्या मगरमिठीत सापडले आहे. फायनान्सच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार व छोट्या व्यावसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करून त्याची लूट सर्रास सावकारांकडून होत आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक त्रस्त आहे. शिक्षण घेवून नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरी शोधण्यापेक्षा आपला मोर्चा छोट्या व्यवसायांकडे वळविला आहे. परंतु राष्ट्रीय बँका कर्ज मंजूर करीत नाही. विविध महामंडळे केवळ नावापुरतीच आहे. त्यामुळे नाईलाजास्तव हे बेरोजगार खासगी सावकारांकडे जातात व त्यांच्या या लाचारीचा पुरेपूर फायदा सावकार मंडळी उचलतात. अंगावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे सध्या छोटे व्यावसायिक डबघाईस आले आहे. व्यवसाय वाढीच्या आशेने त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करणे तर दूरच व्याजातच त्यांचा सुरू असलेला व्यवसायसुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. फायनान्स या गोंडस नावाखाली छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे शोषण या अवैध व्यावसायिकांनी सुरू केले आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. स्पर्धेच्या युगात उच्च तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे कुठलीही खासगी किंवा शासकीय नोकरी उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता नसते. तसेच कोणत्याही प्रकारचे लागेबांधे व पैसा गाठीशी नसल्याने संस्था अथवा अशा तत्सम ठिकाणी नोकरी मिळणे अतिशय जिकिरीचे काम असते. त्यामुळेच उच्चशिक्षित तरुणही चहा टपरी, पानठेला, फळ विक्री, हॉटेल, प्रवासी वाहतूक आदी व्यवसाय करू लागले आहे. परंतु अनुभव नसल्यामुळे आणि अंगावर कर्ज असल्यामुळे त्यांना या व्यवसायात आवश्यक परतावा मिळत नाही. परंतु सावकार मात्र व्याजावर व्याज लावतच राहतो. दहा हजार रुपये कर्ज घेतल्यास पहिला हप्ता म्हणून व्याजाचे दीड हजार रुपये कापून साडेआठ हजार रुपये गरजूच्या हातावर टिकविले जाते. त्यानंतर प्रतिदिन अथवा प्रतिमाह वसूली सुरू होते. सावकाराची माणसे वसुलीसाठी येतात. त्यांना निमुटपणे व्याजाचा हप्ता न दिल्यास ते धमकावतातसुद्धा अन्यथा आधीच घेतलेले बँकेचे धनादेश बँकेत टाकण्याची धमकी देतात. तसेच सावकाराकडे गहाण असलेल्या वस्तू विकण्याचीही धमकी देतात. प्रसंगी विकूनही टाकतात. त्यामुळे नाईलाजास्तव काहीही करून व्याजाचा हप्ता तयार ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. (शहर प्रतिनिधी)