Six people were punished in Yavatmal district for violating the ban | संचारबंदी मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सहा जणांना शिक्षा

संचारबंदी मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सहा जणांना शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांना पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गजेंद्र वानखेडे यांनी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
युगल किशोर हरीमुख, ब्रम्हानंद अंगदप्रसाद चौधरी, मो.फैजान इफतेकार हुसेन, व्ही. राजेश्वर राजहैय्या राव, शाहरुख सलमान खान आणि मो. आसीफ मो. युसुफ अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्यावर बुधवारी गुन्हे नोंदवून प्रकरण न्याय प्रविष्ठ केले होते. प्रत्येकी पाच हजारांचा दंड न भरल्यास सात दिवस कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Web Title: Six people were punished in Yavatmal district for violating the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.