शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

भाजीचे ढिगच्या ढिग विकूनही साधे नाश्त्यापुरते पैसे मिळत नाहीत हो; बळीराजा परिस्थितीपुढे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 5:41 PM

गेल्या आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला. अशी अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे.

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळ : ‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. महागडी मजुरी देऊन तोडणी केली. मार्केटमध्ये विकायला नेले तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. पालक भाजीला कुणी विचारतही नाही. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. खरं सांगून साहेब, भाजी विकून शहरात भजे खायलाही पैसे उरत नाहीत’ असे उद्विग्न होऊन महागाव तालुक्यातील गुंजचे नारायण खंदारे सांगत होते. ही एकट्या गुंजच्या शेतकऱ्याची व्यथा नाही, तर सध्या भाजीपाल्याच्या पडलेल्या भावाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था झाली आहे.गेल्या तीन-चार महिन्यांपासून दारावर येणारा भाजी विक्रेता दहा रुपयाला दीड किलो टोमॅटो देत आहे. फुलकोबी आणि पालकाचीही असेच दर आहे. सर्व स्वस्ताई जणू भाजीपाल्यावरच आल्याचे दिसत आहे. दारावरचा भाजी विक्रेता दहा रुपयात दीड किलो टोमॅटो विकत असेल तर ज्याच्या शेतात पिकले त्या शेतकऱ्याला काय मिळत असेल, हा मन सुन्न करणारा प्रश्न आहे. भाजी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा उतरलेल्या दरांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वास्तव पुढे आले. गुंज येथीलच अनिल दुपारते म्हणाले, टोमॅटो, वांगे आता कोणी विकतही घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून तर मार्केटमध्ये पायही ठेवला नाही. शेतात जाण्याची इच्छाही होत नाही. दुष्काळी परिस्थितीत भाजीपाल्यातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेही आमच्या नशिबी दिसत नाही. विठ्ठल दैत यांनी आमच्यापेक्षा मजूर बरे, भाजीपाला विकूनही काही हातात उरत नाही. घर खर्च कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा सवाल त्यांनी केला. बिजोराचे ज्ञानेश्वर कड यांनी अर्ध्या एकरात मलचिंग पेपर टाकून टोमॅटोची लागवड केली. गेल्या आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला. अशी अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी यवतमाळ, वर्धा, आर्णी, आदिलाबाद, पांढरकवडा, नागपूर आदी मार्केटमध्ये भाजीपाला विकण्यासाठी नेतात. नारायण खंदारे सांगत होते, यवतमाळपर्यंत नेण्यासाठी टोमॅटोच्या कॅरेटमागे ३५ रुपये खर्च येतो. तेथे गेल्यावर ५०  रुपये कॅरेट प्रमाणे हाती येतात. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे अनेक शेतकरी सांगत होते.   

भाजीपाला उत्पादनात एकरी २० हजार तोटामहागाव तालुक्यातील गुंज हे जिल्ह्यातील सर्वाधिक भाजीपाला पिकविणारे गाव. भाजीपाल्यातूनच अनेक घरात समृद्धी आली. परंतु यंदा या शेतकºयांना आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडण्याची वेळ आली. प्रकाश खंदारे सांगत होते, फुलकोबी शेतातच सडत आहे. टोमॅटो काढायला मजुरी परवडत नाही. मशागतीपासून तर विक्रीपर्यंतचा हिशेब लावला तेव्हा प्रती एकर २० हजार रुपयाने आम्ही तोट्यात आलो. टोमॅटोच्या एक एकर शेतीच्या मशागतीसाठी पाच हजार रुपये, बियाण्यांसाठी पाच ते सात हजार रुपये, टोमॅटोची झाडे सुतळीने बांधण्यासाठी चार हजार रुपये खर्च, फवारणीसाठी तीन हजार रुपये आणि माल तोडण्यासाठी एकरी पाच हजार रुपये खर्च येतो. एवढे करूनही बाजारात टोमॅटोचे कॅरेट ३० ते ३५ रुपयाला जात असेल तर जगायचे कसे असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यातून वाढली आवक यवतमाळच्या भाजी बाजारात फेरफटका मारला तेव्हा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन आलेली वाहने दिसत होती. मराठवाड्यात गत महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून बचावलेला हा माल कवडीमोल भावात शेतकरी विकत आहेत. जो माल मे महिन्यात निघायचा तो वातावरणातील बदलाने मार्चमध्येच निघत आहे. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला उठावच नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या