शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जा निर्मितीला ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

यानुसार केवळ ३०० युनीटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी नेट मिटरिंग लागू राहणार आहे. अर्थात ग्राहकाने ३०० युनीटपेक्षा जास्त निर्माण केलेली वीज वितरण कंपनीला ३.६४ रुपये प्रती युनीट दराने द्यावी लागणार आहे. ३०० युनीटपेक्षा जास्त वापरलेल्या विजेसाठी स्थिर आकार अधिक वीज आकार किमान ११.१८ रुपये प्रती युनीट किंवा त्याहून अधिक दराने वीज बिल भरावे लागणार आहे. ही सौर ऊर्जा ग्राहक, उत्पादक व उद्योजकांसाठी मृत्यूघंटा असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे.

ठळक मुद्देवीज ग्राहक संघटना : ग्राहक, उत्पादक व उद्योजकांना धक्का, आयोगाचे नवीन प्रारूप जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सौर ऊर्जेची निर्मिती, वापर, मिटरिंग व बिलींगबाबतचे नवीन प्रारूप हरकतीसाठी जाहीर केले आहे. यानुसार केवळ ३०० युनीटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी नेट मिटरिंग लागू राहणार आहे. अर्थात ग्राहकाने ३०० युनीटपेक्षा जास्त निर्माण केलेली वीज वितरण कंपनीला ३.६४ रुपये प्रती युनीट दराने द्यावी लागणार आहे. ३०० युनीटपेक्षा जास्त वापरलेल्या विजेसाठी स्थिर आकार अधिक वीज आकार किमान ११.१८ रुपये प्रती युनीट किंवा त्याहून अधिक दराने वीज बिल भरावे लागणार आहे. ही सौर ऊर्जा ग्राहक, उत्पादक व उद्योजकांसाठी मृत्यूघंटा असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे.सौर ऊर्जा यंत्रणा जेथे उभी करावयाची ते छत वा ती जागा ग्राहकाची, यंत्रणा उभारणीचा सर्व खर्च व कर्जाचा बोजा ग्राहकावर, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्राहकाची अर्थात सर्व मालकी ग्राहकाची मात्र निर्माण होणाऱ्या विजेवर मालकी महावितरण कंपनीची, असे हे अजबगजब विनियम आहे. याशिवाय विविध जाचक व अन्यायकारक तरतुदी यामध्ये आहे. घरगुती वगळता अन्य सर्व प्रकारच्या ग्राहकांना ३०० युनीटचीही सवलत नाही. त्यांना पहिल्या युनीटपासून सर्व वीज कंपनीला द्यावी लागणार आहे. वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक वीज ग्राहकाला स्ववापरासाठी स्वत: कोणत्याही पद्धतीची वीज निर्माण करण्याचे व वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. नवीन प्रारूप विनियमाने ते काढून घेतले जात आहे. या नवीन विनियमनचा फटका ३०० युनीटहून अधिक वीज वापरणारे घरगुती ग्राहक तसेच सर्व व्यापारी, सार्वजनिक सेवा व प्रामुख्याने औद्योगिक ग्राहकांना बसणार आहे. एक हजार केव्हीएपर्यंत विजेचा वापर करणारे सुमारे चार लाख औद्योगिक ग्राहक महाराष्ट्रात आहे. त्यांना स्वस्त वीज उपलब्ध करून घेण्याचा मार्ग कायमचा बंद होणार आहे. याचा परिणाम औद्योगिक विकासावर होणार आहे. आज सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात सुमारे पाच हजार लघुद्योग कार्यरत आहे. त्यावर आधारित रोजगार एक लाख २० हजार इतके आहे. हे उद्योग बुडण्याची परिणामी रोजगार संपण्याची भीती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व प्रशांत दर्यापुरकर यांनी व्यक्त केली आहे.ग्राहकास कोणताही लाभ नाही. गुुंतवणूक ग्राहकाची आणि फायदा कंपनीचा असल्याने ग्राहक गुंतवणूक करणार नाही. परिणामी छतावरील ऊर्जा (रूफ टॉप सोलर) ही यंत्रणा पूर्णपणे नामशेष होईल. नेट बिलींग पद्धतीमुळे दरवाढीचा प्रचंड मोठा फटका बसेल, असे होगाडे व दर्यापूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.हरकती दाखल करण्याचे आवाहनमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने जाहीर केलेल्या विनियमावर १८ नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती आयोगाकडे दाखल कराव्या, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ वीज कंपन्यांच्या फायद्यासाठी ग्राहक व राज्याच्या हिताचा बळी देण्याचे काम सरकार व कंपनी नियंत्रित आयोग करीत आहे, असा आरोप प्रताप होगाडे व प्रशांत दर्यापूरकर यांनी संयुक्त पत्रकातून केला आहे.

टॅग्स :electricityवीज