मुले पळविणारी टोळी समजून सात जणांना बदडले; पोलिसांनी वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:54 IST2026-03-16T14:52:49+5:302026-03-16T14:54:23+5:30

Yavatmal : मुकुटबन येथून डुक्कर खरेदी करणाऱ्या सात जणांनी रविवारी सकाळी एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला वाहनात डांबले. नंतर ते एमएच ४३ ए ९९८८ क्रमांकाच्या कारने घाटंजीमार्गे बोरीअरब (ता. दारव्हा) येथे जाण्यासाठी निघाले.

Seven people were mistaken for a gang of child kidnappers; Police rescued them | मुले पळविणारी टोळी समजून सात जणांना बदडले; पोलिसांनी वाचवले

Seven people were mistaken for a gang of child kidnappers; Police rescued them

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी/यवतमाळ :
मुकुटबन येथून डुक्कर खरेदी करणाऱ्या सात जणांनी रविवारी सकाळी एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला वाहनात डांबले. नंतर ते एमएच ४३ ए ९९८८ क्रमांकाच्या कारने घाटंजीमार्गे बोरीअरब (ता. दारव्हा) येथे जाण्यासाठी निघाले. अकोलाबाजार परिसरातील कामठवाडा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने कारची गती कमी झाली. याच संधीचा फायदा घेत व्यावसायिकाने आरडाओरडा केला. गावातील नागरिकांना मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यांनी कारवर दगडफेक सुरू केली. पांढुर्णा व कामठवाडातील ग्रामस्थांनी टोळक्याला पकडून बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी सात जणांची सुटका केली.

संजय सोनकर, रा. जोनपूर, उत्तर प्रदेश हे मुकुटबन येथे डुकरांचे केस खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांना बोरीअरब येथील रामा जाधवसह सात जणांनी बळजबरीने हातपाय बांधून कारमध्ये कोंबले. तेथून ते बोरीअरबकडे निघाले. कामठवाडा गावाजवळ संजयने आरडाओरडा केला. ग्रामस्थांना मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यांनी कारवर दगडफेक केली. यातून वाचण्यासाठी कार घेऊन तळणीकडे टोलके निघाले. दरम्यान कामठवाड्यातील ग्रामस्थांनी याची माहिती पांढुर्णा येथील गावकऱ्यांना दिली. ते गावकरी तयारीतच होते. मागून पाठलाग, पुढे अडथळा अशा स्थितीतही सुसाट वेगाने टोळके कार पळवत होते. यात कारचे पुढील दोनही टायर निघून गेले, तरीही ते थांबण्यास तयार नव्हते. यामुळे ग्रामस्थांचा संशय आणखी बळावला. शेवटी रामा जाधवसह सात जण कारमधून उतरून बाहेर पळू लागले. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना रस्त्यावरच पकडून बेदम मारहाण केली.

ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका....

ग्रामस्थांच्या तावडीतून पोलिसांनी रामा जाधव, सौरव राजेश खोपे, अविनाश सुनील तायडे, उंबरेश गोपाल नायकर, राहुल नेमाडे, विलास नागपुरे व राहुल कांबळे (सर्व रा. बोरीअरब, ता. दारव्हा) यांची सुटका केली, तर मारहाणीत राहुल नेमाडे व विलास नागपुरे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल कांबळे पसार झाला आहे.

Web Title : भीड़ ने समझा बच्चा चोर गिरोह, सात की पिटाई; पुलिस ने बचाया

Web Summary : यवतमाल के पास ग्रामीणों ने अपहरण गिरोह समझकर सात लोगों पर हमला कर दिया। भीड़ ने उनकी कार पर पथराव किया और पुलिस के हस्तक्षेप से पहले उन्हें बुरी तरह पीटा। दो गंभीर रूप से घायल, एक फरार।

Web Title : Mob Thinks They're Kidnappers, Beats Seven; Police Rescue Them

Web Summary : Villagers, suspecting a kidnapping gang, attacked seven men transporting a businessman near Yavatmal. The mob stoned their car and severely beat them before police intervened. Two men were seriously injured and one escaped.