शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ प्रवास मोफत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:06 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

ठळक मुद्देस्मार्टकार्ड सुविधा । सहा महिने चालणार नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्डद्वारे चार हजार किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करता येणार असल्याची माहिती पसरविली जात आहे. महामंडळाची अशी कुठलीही योजना नाही. स्मार्टकार्ड नोंदणी प्रक्रिया पुढील काळाची गरज लक्षात घेवून सुरू करण्यात आली आहे. नोंदणी होईपर्यंत सध्या चालत असलेल्या पद्धतीनुसारच प्रवास करता येणार आहे. आधारकार्ड, मतदानकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड आदी सरकारी कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेता येणार आहे.महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने स्मार्टकार्ड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. विद्यार्थी सवलत पास, समाजसेवक, पुरस्कार प्राप्त नागरिक, पत्रकार आणि ६५ वर्षेवयावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी करू नये, अशी विनंती विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी केली आहे.ज्येष्ठ नागरिकांची नोंदणीकरिता गैरसोय होऊ नये याकरिता यवतमाळ विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले. स्मार्टकार्ड उपलब्ध झाले नसले तरी आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीतच प्रवास करता येणार आहे. स्मार्टकार्ड मिळाल्यानंतर मात्र त्याचाच वापर करता येणार आहे. एसटीद्वारे चार हजार किलोमीटर मोफत प्रवास अशी माहिती पसरविली जात आहे. याकडे ज्येष्ठ नागरिकांनी दुर्लक्ष करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.नोंदणी काऊंटर वाढविण्याची गरजमहाराराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेणारे हजारो नागरिक आहेत. त्यांची स्मार्टकार्ड काढण्यासाठी गर्दी होत आहे. नोंदणीसाठी यवतमाळ बसस्थानकावर केवळ एकच काऊंटर आहे. एका नोंदणीला १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. याच पद्धतीने नोंदणी सुरू राहिल्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर व्हावी यासाठी काउंटर वाढविणे आवश्यक आहे. विभागीय कार्यालयात एैसपैस जागा आहे. कर्मचारीही भरपूर आहे. याठिकाणी काऊंटर सुरू केल्यास सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.