शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाला सहा महिन्यातच भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला भेगा पडत आहे.

ठळक मुद्देनागपूर-बोरी-तुळजापूर मार्ग : अंबोडा ते खडकादरम्यान झाली दुर्दशा, चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सुरू आहे. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत अंबोडा ते खडका दरम्यान सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याने या रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला भेगा पडत आहे. त्यामुळे हा रस्ता खरोखरच दावा केल्याप्रमाणे २० वर्ष टिकणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.कामात अनियमितता होत असल्याचे दिसत आहे. याकडे बांधकामावर देखरेख करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का हेही निरूत्तरीत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अतिशय मंदगतीने काम केल्या जात आहे. रस्ता बांधकामात वापरल्या जाणारे साहित्य योग्य दर्जाचे आहे का, रस्त्यावर मधोमध भेगा पडल्या असल्याचे स्पस्ट पणे दिसत आहे. अंदाजपत्रका नुसार योग्य प्रकारचे दजेर्दार साहित्य वापरने गरजेचे आहे. या कामाची पारदर्शकता अनेक वाहनधारकाना दिसून आली आहे.हा सर्व प्रकार पाहता सबंधित कामाकडे शासकीय अभियंत्याचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. एकंदरच हजारो कोटीच्या या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग