शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सेना व भाजप बंडखोरात ‘काटे की टक्कर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी व त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असे समीकरण संजय देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापुढे मांडले होते. मात्र घड्याळ हाताला बांधण्याचा आग्रह असल्याने हा प्रस्ताव बारगळला. राष्ट्रवादीने तेथे नवा चेहरा म्हणून तारिक लोखंडवाला यांना उमेदवारी दिली.

ठळक मुद्देलक्षवेधी लढत : राष्ट्रवादी काँग्रेसही लढतीत, ‘सीएम’च्या सभेने ‘बुस्ट’

राज्यात सर्वाधिक एक लाख मतांची आघाडी घेऊन विजयी होण्याचे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवत चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांच्यापुढे भाजपचे बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड, संजय देशमुख आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे मो. तारिक मो. शमी (लोखंडवाला) यांच्यात तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत. येथे १० उमेदवार रिंगणात आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे बंडखोर संजय देशमुख रिंगणात उतरले आहे. यापूर्वी ते अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शिवसेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी व त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असे समीकरण संजय देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापुढे मांडले होते. मात्र घड्याळ हाताला बांधण्याचा आग्रह असल्याने हा प्रस्ताव बारगळला. राष्ट्रवादीने तेथे नवा चेहरा म्हणून तारिक लोखंडवाला यांना उमेदवारी दिली. ते मतदारसंघातील अल्पसंख्यक व राष्ट्रवादी तसेच आघाडीची मते आपल्याकडे खेचण्यात कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरते. भाजप बंडखोर संजय देशमुख मतदारांच्या सर्वच गटात ‘वाटेकरी’ बनतील असा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणातून अप्रत्यक्षपणे देशमुखांच्या उमेदवारीवर आसूड ओढले असले तरी प्रभावी अपक्ष म्हणूनही त्यांच्याकडे मुंबईतून सहानुभूतीने पाहिले जात असल्याचे सांगितले जाते. लोकसभेत भाजपला पोषक असलेले वातावरण विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत नाही. काठावरचे संख्याबळ मिळाल्यास सत्ता स्थापनेसाठी अपक्ष निर्णायक भूमिका वठवू शकतात. अशा वेळी युतीला आणि विशेषत: भाजपला पोषक असलेल्या अपक्षांना दुखवू नये, असा वरच्या स्तरावरील छुपा अजेंडा असल्याचेही बोलले जाते.बालेकिल्ल्यात शिवसेना चौथ्यांदा विजयी होणार असा दावा राठोड समर्थक करीत आहे. त्यांनी सामूहिक लाभाऐवजी वैयक्तिक लाभाच्या योजनांवर दिलेला भर, त्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न, आरोग्य सेवा, शिबिरे या संजय राठोड यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. दिग्रस, दारव्हा, नेर या तीनही तालुक्यात शिवसेनेचे असलेले नेटवर्क, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता, सहकारावरील वर्चस्व या बळावर शिवसेना आपली जागा कायम राखेल असे मानले जाते. आतापर्यंत एकतर्फी वाटणारी लढाई शिवसेनेसाठी मात्र भाजप बंडखोर संजय देशमुख यांच्या उमेदवारीने चांगलीच अटीतटीची बनली आहे. राष्ट्रवादीचे लोखंडवाला तेथे भाजप बंडखोरासाठी मतविभाजनामुळे डोकेदुखी ठरू शकतात. देशमुख व लोखंडवाला हे शिवसेनेची मतांची आघाडी कितीने कमी करतात याकडेच संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने येथे अ‍ॅड. शहेजाद शम्मीउल्ला खॉ यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :digras-acदिग्रस