शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कच्चे बिल देऊन विक्रीकराची चोरी

By admin | Updated: February 28, 2015 02:03 IST

उमरखेड तालुक्यात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाही. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते.

अविनाश खंदारे  उमरखेड उमरखेड तालुक्यात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाही. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत असून ग्राहकांचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमरखेड शहरासह तालुक्यात ढाणकी, मुळावा, पोफाळी, विडूळ, बिटरगाव, ब्राम्हणगाव, चातारी, जेवली, निंगनूर या मोठ्या गावांमध्ये विविध दुकाने आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री केली जाते. कुठलीही वस्तू विकल्यानंतर त्याची पक्की पावती देण्यात यावी, असे आदेश आहे. मात्र लाखो रुपयांचा व्यवहार असला तरी कोऱ्या कागदावरच लिहून दिले जाते. व्यावसायिकांनी वापरलेल्या या फंड्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. कारण एखादी वस्तू सदोष आढळल्यास न्याय मिळवून घेण्यासाठी त्याच्याजवळ कुठलाही पर्याय राहत नाही. बांधकाम साहित्य विक्रेते, कापड दुकानदार, लाकूड व्यावसायिक, औषधी, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स सेंटर, कृषी सेवा केंद्र आदी व्यावसायिकांनी ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूची पक्की पावती देणे बंधनकारक आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र ग्राहकाला छापील पावती दिली जात नाही. ग्राहकही आग्रह धरत नाही. मात्र काही लोकांनी पावतीची मागणी केल्यास एका कोऱ्या कागदावर वस्तूची खरेदी किंमत लिहून दिली जाते. हा प्रकार केवळ कर चुकविण्यासाठी केल्याचे दिसून येते. पक्की पावती दिल्यास त्याचा हिशेब शासनाला सादर करावा लागतो. वर्षभराच्या उलाढालीवर व्यावसायिकाला कराची रक्कम भरावी लागते. ही रक्कम वाचविण्यासाठी पावती दिली जात नाही. मात्र त्याचा फटका ग्राहकाला बसण्याची शक्यता असते. एखादी वस्तू सदोष आढळल्यास त्याबाबत कुठेही न्याय मागता येत नाही. काही ग्राहक आग्रह करून पक्की पावती मागतात. तेव्हा संबंधित विक्रेता टोलवाटोलवी करतो. जास्तच आग्रह झाल्यास कोऱ्या कागदावर आपल्या दुकानाचा शिक्का मारून पावती दिली जाते. यावरून संबंधिताने वस्तू खरेदीबाबत संशय निर्माण होतो. जनजागृतीचा अभाव, ग्राहकच बिल मागत नसल्याचा सुरग्राहक हा राजा आहे, असे म्हटले जाते. मात्र हा राजा वस्तू खरेदी करताना आपले राजतेज दाखवितच नाही. अनेकांना तर पक्की पावती कशाला असे वाटते. विशेष म्हणजे ग्राहकांमध्ये बिलांबाबत जागृतीच नाही. ग्राहक संघटनांच्यावतीनेही जनजागृती केली जात नाही. फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करावी, याचीही माहिती त्यांच्याकडे नसते. अपवाद वगळता कोणताही ग्राहक दुकानदाराला बिल मागतना दिसत नाही. ग्राहकच बिल मागत नाही तर दुकानदार स्वत:हून देणार तरी कसे, असा सवाल काही दुकानदार करीत आहे. मात्र नियमानुसार बिल देणे गरजेचे असताना उमरखेड तालुक्यात बहुतांश दुकानदार कर वाचविण्यासाठी बिलच दिसत नसल्याचे दिसते. परंतु कारवाई कोणावरही झाल्याचे दिसत नाही.