स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 17:20 IST2018-06-24T17:19:41+5:302018-06-24T17:20:23+5:30
वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ - वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रमिला रामकृष्ण आस्वले (४५), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.