यवतमाळ जिल्ह्यात आढळले खवल्या मांजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:34 IST2020-06-18T14:34:03+5:302020-06-18T14:34:31+5:30
आर्णी येथील विठ्ठल मंदिर परिसरात बुधवारी रात्री दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. वन विभागाने या मांजराला ताब्यात घेतले.

यवतमाळ जिल्ह्यात आढळले खवल्या मांजर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी येथील विठ्ठल मंदिर परिसरात बुधवारी रात्री दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. वन विभागाने या मांजराला ताब्यात घेतले. विठ्ठल मंदिर परिसरातील सुयोग चिंतावार यांच्या घरासमोर बुधवारी रात्री दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. याची माहिती मिळताच नागरिकांनी मांजर बघण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच वन विभागाला माहिती देण्यात आली. रात्री १२ वाजताच्या सुमारास वन विभागाने हे मांजर ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी या मांजराला सुरक्षितरित्या जंगलात सोडून देण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. रोडगे व वन कर्मचाऱ्यांनी खवल्या मांजराला जंगलात सोडून दिले.