शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांमुळे शेतकऱ्यांना संजीवनी

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास

नांदेपेरा : ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास कमी झाला आहे. शिवाय कुटुंबातील आर्थिक कामे सहजरीतीने होताना दिसत आहे़ गेल्या काही वर्षांपूर्वी बँकांकडून कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांच्या दरवाजात जाऊन त्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते़ त्याचाच फायदा घेत सावकार शेतकऱ्याला अव्वाच्या-सव्वा व्याज आकारून कर्ज देत होते. त्यातच जमानत म्हणून शेतीसुद्धा गहाण करून घेत होते. त्याबाबत लेखी स्वरूपात करारनामा करून घेतला जात होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसुद्धा सावकारांनी गिळंकृत केल्या आहेत. मात्र आता ग्रामीण भागात महिला, पुरूष यांनी एकत्रित येऊन बचत गटांची निर्मिती केल्याने सावकारांना बराच चाप बसला आहे. बचत गटांमुळे बँकेत खाते उघडून व्यवहार गावातच होताना दिसत आहे़ त्यामुळे आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत चालले आहे़ बचत गटांना बँकेकडूनही कर्ज मिळत असल्याने अनेक बचत गटांनी गावातच काही लघु व्यवसाय सुरू केले आहे़ त्यामुळे महिलांना या बचत गटांद्वारे गावातच रोजगारही मिळाला आहे़ पुरूषांच्या बचत गटांपेक्षा महिला गटांची सरशी दिसून येत आहे़ बचत गटाची निर्मिती झाली़ या बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. या बचत गटांना पुढे नेण्याकरिता पंचायत समितीमध्ये गटांना प्रशिक्षण देण्याकरिता कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पुरेशा प्रमाणात सहकार्य मिळात नसल्याचे काही महिला बचत गटांच्या सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बचत गटांना बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (वार्ताहर)