शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा होतोय बिनधोक लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 22:19 IST

नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून महानगरात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासावर नागरिकांचा आतापर्यंत विश्वास होता. मात्र नाशिक दुर्घटनेनंतर प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिवहन विभाग अक्षरश: सामान्य नागरिकांच्या जिवाचा लिलाव करीत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. प्रवासी क्षमता ३० असताना  तब्बल ५५ प्रवासी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असल्याचे उघड झाले आहे. हा अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रकार परिवहन विभागाच्या संमतीनेच सुरू असल्याचे पुढे आले आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचा अक्षरश: लिलाव केला जातो. सणासुदीच्या काळात तर मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे वसूल केले जातात. एकीकडे ही मनमानी असताना प्रवासी सुरक्षिततेकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. क्षमतेच्या दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबून १० ते १५ तासांचा प्रवास करण्यास भाग पाडले जाते. प्रवासाची पर्यायी साधने नाहीत, ही बाब ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना चांगली ठाऊक आहे. यातूनच प्रवाशांच्या जीविताशी खेळणारे चक्र सुरू झाले आहे. परिवहन विभागाने प्रवासी वाहतुकीची सुरक्षा वारंवार तपासणे आवश्यक आहे. मात्र आजतागायत एकाही ट्रॅव्हल्सला अपवादानेही अतिरिक्त प्रवासी भरल्याबाबतचा मेमो देण्यात आलेला नाही. नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. ट्रॅव्हल्स मालकांकडून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. चालक व वाहकाने रस्त्याने अतिरिक्त प्रवासी भरले, असे बेजबाबदारीचे उत्तर दिले जात आहे. या प्रकरणात फौजदारी संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, असेही विधिज्ञांकडून सांगितले जात आहे. 

नाशिक अपघातात जिल्ह्यातील मृतांची संख्या झाली तीन - नाशिक येथे झालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातात अज्ञात मृतांची ओळख पटविणे सुरू आहे. शनिवारी अजय कुचनकर (१६) रा. मांगरुळ, ता. मारेगाव याची ओळख पटली होती. रविवारी आलेल्या यादीत पुसद येथील सुरेश लक्ष्मण मुळे या मृताची ओळख पटली आहे. तर यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील हरी तुकाराम भिसनकर (२४) या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यासाठी त्याच्या पत्नीला बोलविण्यात आले. मात्र तिलाही जळालेला मृतदेह ओळखता आला नाही. आता डीएनए चाचणीद्वारे संशयित मृतदेह हरीचाच आहे काय हे निश्चित केले जाणार आहे. तूर्त तरी शासकीय रेकाॅर्डप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हरी तुकाराम भिसनकर याच्याबाबतची चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास त्यालाही मृत जाहीर केले जाईल.

 

टॅग्स :Accidentअपघातfireआग