शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

निर्धुर ग्राम

By admin | Updated: June 5, 2016 02:09 IST

पर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे.

पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड बनले रुपेश उत्तरवार यवतमाळपर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पर्यावरणाशी समरस झालेली काही गावे आदर्श म्हणून पुढे आली आहेत. यवतमाळ वनवृत्तातील पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड गाव वनग्राम म्हणून घोषित झाले आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबात आज गॅस सिलिंडर आहे. त्याचा नित्यनियमाने वापर झाल्याने हे गाव निर्धुर ग्राम बनले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०४० गावांपैकी आर्णी तालुक्यातील पिंपळनेर, यवतमाळ तालुक्यातील सायखेडा बंदी आणि नेर तालुक्यातील मालखेड खुर्द या गावांनी एक नवा आदर्श जिल्ह्यापुढे निर्माण केला आहे. २०१४ पासून या गावांचा कायापालट झाला आहे. ही गावे जंगलात असली तरी यांच्याकडे जलतनासाठी लाकूड वापरले जात नाही. त्याऐवजी आता गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे.त्याकरिता ग्रामसभेने ठराव घेतला आणि संपूर्ण गावाने सिलिंडर वापरण्याचा निर्णय घेतला. वनविभागाने यासाठी गावाला मदतीचा हात दिला आहे. यामध्ये २५ टक्के निधी लाभार्थी आणि ७५ टक्के वाटा वनविभागाने उचलला आहे. यामुळे आज या ठिकाणी घरोघरी सिलिंडर दिसतात. यातून संपूर्ण गाव निर्धुर झाले आहे. गाव इतक्यावरच थांबले नाही, तर गावाने कुऱ्हाड बंदी, चराई बंदी आणि वनव्यापासून सदैव जंगलांना वाचविण्याचे काम केले आहे. जंगलाप्रती त्यांच्यामध्ये असलेले उत्कट प्रेम त्यांच्या कार्यातून दिसून येते. यासोबतच गावकऱ्यांनी जंगलामध्ये वृक्षलागवड केली आहे. आज जंगलातील हे टुमदार गाव पर्यटनस्थळालाही लाजवेल असेच आहे. या ठिकाणी मोर, लांडोर, हरिण, नीलगाय आणि इतर प्राणी जवळून पाहायला मिळतात. जणू हे प्राणी आणि ग्रामस्थ एकाच परिवारातील असावे असाच अनेकवेळा भास होतो. त्यांनी हाती घेतलेला पर्यावरण संवर्धनाचा विडा अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.