शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

सदाशिवराव ठाकरे (९७) यांचे मंगळवारी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली होती. इंझाळाचे ते मूळचे रहिवासी होते. बुधवारी सकाळी ११.५० वाजता त्यांचे पार्थिव यवतमाळ येथून इंझाळा येथे आणण्यात आले. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

ठळक मुद्देइंझाळा येथे अंत्यसंस्कार : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतले अंतिम दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : भूदान चळवळीचे प्रणेते तथा माजी खासदार दिवंगत सदाशिवराव ठाकरे (काका) यांच्या पार्थिवावर बुधवारी इंझाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सदाशिवराव ठाकरे (९७) यांचे मंगळवारी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली होती. इंझाळाचे ते मूळचे रहिवासी होते. बुधवारी सकाळी ११.५० वाजता त्यांचे पार्थिव यवतमाळ येथून इंझाळा येथे आणण्यात आले. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकृष्ण पाटील राऊत, आर्णीचे माजी सभापती विजय पाटील राऊत, पांढरकवडा बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश मानकर, किशोर दावडा, शंकरराव ठाकरे, अभिषेक ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, बल्लू पाटील लोणकर आदींसह विविध पक्षीय नेते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.तहसीलदार पूजा मोटोडे, ठाणेदार दिनेश शुक्ला यांनी प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रा. प्रदीप राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्य सभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे गुलामनबी आझाद, खासदार सुप्रिया सुळे, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्या शोकसंदेशांचे वाचन केले. दिवंगत सदाशिवराव ठाकरे यांचे चिरंजीव जितेंद्र यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मुखाग्नी दिला. त्यानंतर सदाशिवराव ठाकरे पंचतत्त्वात विलीन झाले. उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत अंत्यदर्शन घेतले.गुलाम नबी आझाद यांची श्रद्धांजलीसदाशिवराव सर्वांसाठीच आदरणीय होतेगांधीवादी व ज्येष्ठ सर्वोदयी नेते तथा काँगे्रस पक्षाचे माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दु:ख झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, आमदार, खासदार म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे सदाशिवराव सर्वांचे काका होते. सर्वांसाठी ते आदरणीय होते. एक आदर्श मार्गदर्शक म्हणून त्यांनी पक्षामध्ये आपली जागा निर्माण केली होती. आज हा मार्गदर्शक आम्हाला सोडून गेला, ही उणीव कधीही भरून निघणार नाही.- गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्ष नेता, राज्यसभा

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा