शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कृषी विभागाला ग्रामीण परिसराची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: August 31, 2015 02:16 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात खरिपाच्या लागवडीनंतर कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन पाहिले नाही.

हिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात खरिपाच्या लागवडीनंतर कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन पाहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शनच मिळत नाही. केवळ संबंधित कृषी सहाय्यक गावात येतो व योजनेसंदर्भात माहिती सांगून जातो. शेतकऱ्यांना सध्या खरी गरज आहे ती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची. परंतु कृषी विभागातील अधिकारी वर्गाला हिवरी परिसराची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसून येते. सुरूवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी काळजीेत होते. त्यातून कसेबसे वाचले असताना आता पीक दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पिके डोलू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीही आनंदात होते. परंतु अशातच सोयाबीन व कपाशीवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशावेळी वेळीच बंदोबस्त केल्यास पिकांची सरासरी घटणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती पीक पाहणी करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन कुठल्या रोगावर कोणते औषध फवारावे तसेच कोणत्या पिकांना कोणते खत द्यावे आदी माहितीची नितांत गरज आहे. परंतु कृषी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कृषी केंद्र चालकाच्या मर्जीप्रमाणे महागडी औषधे घेऊन शेतकरी फवारणी करीत आहेत व पिकांना खत देत आहेत.फवारणी केल्यानंतर किंवा खत दिल्यानंतर त्याचा कोणताही फायदा या पिकांना झालेला नाही, असा हिवरी परिसरातील व इतर गावातीलही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येते. याबाबत संबंधित कृषी केंद्रात जाऊन विचारणा केल्यास वातावरणातील बदल किंवा फवारणीचे पाणी अस्वच्छ असणे, जास्त पाणी टाकणे, कमी औषध टाकल्यामुळे हा प्रश्न निर्माण होत असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगितल्या जाते. यातील खरे कारण म्हणजे ज्या घटकांची ज्यावेळी, ज्या पिकांना गरज असते ते घटक माहिती अभावी शेतकरी पिकांना देऊ शकत नाही. त्यानंतर कोणतेही औषध फवारून किंवा खते देऊन त्याचा पिकांना आवश्यक तो फायदा होत नाही. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांची खरी गरज असते. याकडे जिल्हा कृषी अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमध्ये होत आहे. (वार्ताहर)