शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार विद्यार्थ्यांचे ‘आरटीई’ प्रवेश थेट शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. समग्र शिक्षाच्या जिल्हा कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील २०० शाळा आरटीईच्या या प्रवेशप्रक्रियेत नोंदणीकृत झाल्या आहेत. या २०० शाळांमधील १६४७ जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकागदपत्र पडताळणीला फाटा : कोरोनामुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा झाली सुरू, जिल्ह्यातील २०० शाळा सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची मोफत प्रवेश प्रक्रिया यंदा कोरोनामुळे अर्धवट राहिली होती. आता शैक्षणिक सत्राची घोषणा झाली असून आरटीई प्रवेश प्रक्रियाही पुढे सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीला फाटा देत जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थ्यांचे थेट शाळेतच प्रवेश होणार आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. समग्र शिक्षाच्या जिल्हा कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील २०० शाळा आरटीईच्या या प्रवेशप्रक्रियेत नोंदणीकृत झाल्या आहेत. या २०० शाळांमधील १६४७ जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या जागांवर प्रवेश देण्यासाठी १७ मार्च रोजीच लॉटरी काढण्यात आली. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया थांबली होती.कारण प्रवेशापूर्वी पंचायत समिती स्तरावर पडताळणी समितीकडे जाऊन विद्यार्थी व पालकांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक होते. आता शिक्षण संचालकांनी बुधवारी दिलेल्या सुधारित आदेशानुसार कागदपत्र पडताळणीचा हा टप्पा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेत पोहोचून तेथेच आपली कागदपत्रे दाखवावी लागणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे आरटीईतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन शिक्षणातही सहभागी करून घेण्याचे आदेश आहे. मात्र संबंधित विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेत कधी बोलवावे याची तारीख ठरविण्याचे अधिकार संंबंधित शाळांना दिले गेले आहे.कागदपत्रात गडबड आढळली तर पालकांवर होणार फौजदारी कारवाईतूर्त कोरोनामुळे कागदपत्र पडताळणी न करता थेट शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. मात्र त्यानंतर शाळेला पडताळणी समितीकडून या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यावर प्रवेश निश्चिती होणार आहे. अशा वेळी पडताळणीत कागदपत्रे चुकीची आढळल्यास, पालकाने पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास अशा पालकांवर फौजदारी कारवाई करणे, विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करणे, त्या पालकाकडून पूर्ण फी घेणे अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार पडताळणी समितीला राहणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण