शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

सायबरच्या दहा गुन्ह्यांतील ११ लाख रुपये झाले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, तर दोन गुन्हे सोशल मीडियावरून झालेल्या फसवणुकीचे आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेल्या २६ जणांचे अर्ज आले होते.

ठळक मुद्दे२६ तक्रार अर्जही निकाली : बँकेशी निगडीत गुन्हे थांबले, सोशल मीडियाद्वारे झाली होती अनेक नागरिकांची फसगत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. जुलै अखेरपर्यंत १० गुन्हे दाखल झाले, तर २६ तक्रार अर्ज वेळेत आल्याने होणारे नुकसान टाळता आले. सायबर सेलने दहा गुन्ह्यातील फसवणुकीच्या १५ लाख रकमेपैकी ११ लाख वसूल करण्यात यश मिळविले आहे. सध्या बँकेशी निगडीत फ्रॉड कमी झाले असून सोशल मीडियावरची फसगत वाढली आहे.ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, तर दोन गुन्हे सोशल मीडियावरून झालेल्या फसवणुकीचे आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेल्या २६ जणांचे अर्ज आले होते. हे अर्ज तातडीने आल्याने एक लाख २० हजार रुपयांची रक्कम सायबर सेलला रिकव्हर करता आली. यातून ग्राहकांचे नुकसान टळले, तर आयटी अ‍ॅक्टच्या दहा गुन्ह्यात १५ लाखांची फसवणूक झाली होती. त्यातील ११ लाख रुपये सायबर टीमने वसूल केले आहे. गेल्या काही दिवसात बँक फ्रॉडचे प्रमाण कमी होत आहे. नागरिक सतर्क झाल्याने ओटीपी, पीन नंबर व इतर माहिती ते फोनवर शेअर करत नाही. त्यामुळेच आता फ्रॉड करणाऱ्यांनीही आपला मोर्चा बदलविला असून ते चांगल्या वाहनांची कमी किमतीत विक्री, उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवून सोशल मीडियातून फ्रेण्डशीप व नंतर फसवणूक करत असल्याची प्रकरणे घडत आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियाचे अ‍ॅप वापरताना टू स्टेप व्हेरिफिकेशन सिस्टीम अपग्रेड करणे गरजेचे आहे.ई-वॉलेटमधील अ‍ॅपच वापरा - एपीआय अमोल पुरीआरबीआयने ऑनलाईन व्यवहारासाठी असलेल्या काही अ‍ॅपला ई-वॉलेट कॉमर्समधून वगळले आहे. त्यामुळे हे अ‍ॅप वापरताना काही अनियमितता झाल्यास पैसे परत मिळणार नाही. यात फोन पे व गुगल पे हे दोनही अ‍ॅप वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय असलेल्याच अ‍ॅपचा वापर करावा. ज्यांचा समावेश ई-वॉलेटमध्ये आहे. जेणेकरून काही अनियमितता झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता राहते, अशी माहिती सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक अमोल पुरी यांनी दिली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम