शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

रस्ते दुरुस्ती जीवावर उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:12 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर-बाभूळगाव रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठीच्या गिट्टीचे ढिग रस्त्याच्या अगदी मधोमध टाकण्यात आले आहे. यावर वाहन आदळून अपघात होत आहे.

ठळक मुद्देनेर-बाभूळगाव मार्गावर गिट्टीचे ढिग : बांधकामचा अजब कारभार

ऑनलाईन लोकमतनेर : सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर-बाभूळगाव रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठीच्या गिट्टीचे ढिग रस्त्याच्या अगदी मधोमध टाकण्यात आले आहे. यावर वाहन आदळून अपघात होत आहे. मागील काही दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्याचे काम जणू वाहनधारकांच्या जीवावर उठले आहे.रस्त्याची रुंदी कमी असल्याने गिट्टी मधातच रिचविली जात आहे. रात्रीच्या वेळी गिट्टीचे ढिग दिसून पडत नसल्याने त्यावर वाहने आदळत आहे. शनिवारी दुचाकी गिट्टी आदळल्याने मांगलादेवी येथील कुंभारखाने पितापुत्र गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तीन युवक जखमी झाले. नेर येथील संतोष अरसोड हे सकाळी फिरायला गेले असता चक्कर आल्याने सायकलसह कोसळले. रस्त्यावरील गिट्टीने त्यांच्या चेहºयाला मार लागला. ओठ फाटले आणि डोक्यालाही गंभीर इजा झाली. एक दुचाकीही ढिगाºयावर आढळल्याने युवक जखमी झाला.रविवारी रात्री दाभा (पहूर) येथील प्रवीण विष्णूपंत दसवंते (२०), आकाश जानराव खडसे (१५) व कृष्णा गंगाधर खडसे (वय २१) हे दुचाकीने नेर येथून दाभा येत जात होते. रस्त्याच्या मधोमध असलेल्या गिट्टीच्या ढिगावर दुचाकी आदळल्याने सदर तिघे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची मालिका सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे मिटून आहे. कंत्राटदारही सोईने काम करत आहे.