शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

वनोजा येथे पोलिसांनी धाड टाकलेल्या रेतीसाठ्याची महसूलकडून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सदर रेती साठ्यावर धाड टाकून पंचनामा केला व यासंदर्भात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना या प्रकरणाची माहिती देत प्रकरण कारवाईसाठी सुपुर्द केले.

ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतातील रेती साठ्यावर वणीतील विशेष पोलीस पथकाने धाड टाकून प्रकरण कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपुर्द केले. महसूल विभागाने या साठ्यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली असता, सदर साठा वैध असल्याचा निर्वाळा वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सदर रेती साठ्यावर धाड टाकून पंचनामा केला व यासंदर्भात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना या प्रकरणाची माहिती देत प्रकरण कारवाईसाठी सुपुर्द केले. डॉ.जावळे यांनी याबाबत मारेगाव तहसीलदारांना सूचना देऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून चौकशी करण्यात आली. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सदर रेतीसाठा वैध असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मारेगाव तालुक्यातील आपटी येथील रेतीघाट अमरावती येथील प्रिन्स एंटरप्राईजेसचे मालक नीलेश बिजवे यांनी लिलावात घेतला. त्यानुसार या रेतीघाटातून १० जून २०२१ पर्यंत ७ हजार ९५१ ब्रास रेती उत्खनन करण्याची त्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र रेतीघाटधारकाने २५ मेपर्यंत केवळ २ हजार ३८१ ब्रास रेतीचे उत्खनन केले. लिलावाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी उर्वरित ५ हजार ५७० ब्रास रेतीचे उत्खनन करून त्याची साठवणूक करण्याची परवानगी देण्याबाबत रेतीघाटधारकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला.  या अर्जानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेतीघाटधारक बिजवे यांना १० जूनपूर्वी रेती साठवणूक करण्याची परवानगी दिली. 

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती परवानगीरेती साठवणुकीसाठी मारेगाव तालुक्यातील गोरज येथील आनंदराव महादेव जिवतोडे तसेच आपटी येथील भाऊराव रामचंद्र उराडे यांच्या शेतात रेतीसाठा करण्यास हरकत नसल्याचा अहवाल मारेगाव तहसीलदारांकडून देण्यात आला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय खनिकर्म शाखा यवतमाळ यांच्या आदेशानुसार सदर जागेवर २५ मे ते १० जूनपर्यंत जास्तीत जास्त ५ हजार ५७० ब्रास रेती साठवण्याची परवानगी देण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला होता.  

वनोजा येथील रेतीसाठ्यावर पोलिसांनी धाड मारल्यानंतर आम्ही यासंदर्भात सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता, सदर रेतीसाठा हा वैध असल्याचे निदर्शनास आले. रेतीघाटधारकाला रेती साठवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. चौकशीदरम्यान परवानगीपेक्षा जास्त रेतीसाठा आढळलेला नाही. रेतीघाटधारकाने सर्व नियम व अटीच्या अधीन राहून रेतीची साठवणूक केली आहे. - डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी.

 

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस