शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिकांना झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

वणी तालुक्यातील शिरपूर, मेंढोली, पिंपरी, बोरगाव, वेळाबाई, आबई, कुर्ली, शिंदोला, घोन्सा, कायर, रासा आदी गावशिवारात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यावेळी ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. सध्या कापूस फुटलेला आहे. कापसाची वेचणी सुरू आहे. काही शेतात मजुरांअभावी वेचणी खोळंबली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे : कापूस भिजला, सोयाबीनच्या शेंगांना फुटले अंकुर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोरोनाच्या सावटात हंगाम साधणाऱ्या शेतकऱ्यांवर आता निसर्गानेच निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने हजेरी लावत असलेल्या पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. गुरवार व शुक्रवार, असे दोन दिवस वणी तालुक्यात कोसळलेल्या पावसामुळे पिकांना चांगलाच फटका बसला. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून वणी परिसरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी सकाळी वणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेतात कापूस फुटला आहे. काही शेतकऱ्यांनी कापसाच्या वेचणीला सुरूवात केली आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने अनेक शेतातील कापूस ओला झाला आहे, तर सोयाबीनच्या शेंगांना अंकुर फुटले आहे. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकांची नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकºयांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहेत.वणी तालुक्यातील शिरपूर, मेंढोली, पिंपरी, बोरगाव, वेळाबाई, आबई, कुर्ली, शिंदोला, घोन्सा, कायर, रासा आदी गावशिवारात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यावेळी ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. सध्या कापूस फुटलेला आहे. कापसाची वेचणी सुरू आहे. काही शेतात मजुरांअभावी वेचणी खोळंबली आहे. सोयाबीन पिकांची कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने पिकांची नासधूस होत आहे. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. यंदाच्या हंगामात शेतकºयांना चांगलाच फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती