शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवासी शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

शिवाणी देवराव वाघमारे (१३) रा.कलगाव, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने सदर निवासी शाळेत मागील वर्षी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत मावस बहीण आठवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना ती अचानक कोसळली. तिला तत्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ठळक मुद्देखेळताना कोसळली : नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शहरापासून २ किलोमीटर अंतरावरील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या निवासी शाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा खेळाच्या साहित्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. दरम्यान, तिच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.शिवाणी देवराव वाघमारे (१३) रा.कलगाव, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने सदर निवासी शाळेत मागील वर्षी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत मावस बहीण आठवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना ती अचानक कोसळली. तिला तत्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महिला अधीक्षक भोयर यांनी घटनेची माहिती मुलीच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर तिचे वडील देवराव वाघमारे यांनी या संदर्भात महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसदला पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.गळा आणि हातांवर ओरबाडल्याच्या जखमाशिवाणीच्या डोक्याला जखम दिसत नाही. मात्र तिच्या मणक्याला जबर दुखापत झाल्याचा अंदाज आहे. तिच्या गळ्याला व दोन्ही हातांना ओरबाडल्याच्या जखमा दिसत आहे. त्यामुळे ही घटना संशयास्पद वाटत असून शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळू शकेल, असे मत सवना ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गजानन डोंगे यांनी व्यक्त केले.शिवाणी व्यायाम साहित्यावर खेळत होती. लोखंडी अँगलवर पडल्याने तिच्या गळ्याला, हातांना जखम झाली. तिचा मृत्यू संशयास्पद नाही. ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. चौकशी सुरू आहे.- मंगला भोयर, अधीक्षिका, निवासी शाळा महागाव

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू