शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१९७५ च्या मदतीची कोरोनात परतफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले.

ठळक मुद्देओल्या दुष्काळाचे सावट, दोन दिवसांपासून उपाशी होती वटफळी गावातील भावंड

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : महाराष्ट्रात १९७५ साली ओला दुष्काळ पडला होता. या दुष्काळात लोकांना कित्येक दिवस स्वत:च्या घरातच काढावे लागले. अशावेळी वटफळीतील दानशूर गोविंदा उर्फ साधू नगराळे यांनी गोविंद वाकडे यांच्या गरीब कुटुंबीयांना पोळ्याच्या सणाला एक ग्लास ज्वारीच्या कण्या देऊन जीवदान दिले होते. त्याची परतफेड म्हणून गोविंदराव वाकडे यांचा मुलगा अंकुश वाकडे यांनी साधू नगराळे यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये स्वत: वटफळीला जाऊन धान्याची मदत केली.गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले. आज या घटनेला ४५ वर्ष झाली. त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे वटफळीत वास्तव्याला आहे. त्याची परिस्थिती जेमतेम आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन जीवघेण्याप्रसंगात यवतमाळमध्ये रहिवासी असलेले अंकुश वाकडे यांनी वटफळी येथे जाऊन नगराळे कुटुंबाला मदतीचा हात दिला. धान्याची कीट देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी तरनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते कपिल तायडे उपस्थित होते.लाखमोलाची मदतमी तीन वर्षांचा असताना माझ्या परिवाराला साधू उर्फ गोविंदराव नगराळे व त्यांच्या पत्नी अलकाबाई नगराळे यांनी केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची ठरली. त्या ज्वारीच्या कण्या मिळाल्या नसत्या तर आम्ही तिन्ही भावंड जगलो नसतो. त्यामुळे त्या मदतीची परतफेड म्हणून मी त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना मदत केली आहे. या परिस्थितीत ही मदत करणे मला मोलाचे वाटले, असे मत प्रा अंकूश वाकडे यांनी व्यक्त केले.सामाजिक जबाबदारीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे रोजगार, मजुरी बुडत आहे. जवळ असलेला पैसा, घरातील अन्नधान्य संपत आले आहे. त्यांच्यापुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. अशावेळी मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. ग्रामीण भागातही आपापल्यापरीने मदत करीत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस