शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रस्त्यांवर सर्वच बाजूंनी अतिक्रमण झालेले आहे. गोरगरिबांपेक्षा धनदांडग्यांनीच रस्त्यावर दुकाने वाढवून ताबा घेतला आहे. ते रस्ते तत्काळ मोकळे करा, अन्यथा नगरपालिकेचा बुलडोझर चालणार, अशा स्वरूपाच्या नोटिसा अतिक्रमणधारकांना बजावण्यात येत आहेत. दारव्हा मार्गावरील २०० च्या वर अतिक्रमणधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे. वाघापूर ते लोहारा बायपासचे अतिक्रमण काढले जाणार आहे. भोसा मार्गावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. दारव्हा नाका ते लोहारा रस्त्यावरचे अतिक्रमण जेथे शोरूम व मोठ्या व्यावसायिकांनी ॲप्रोच रोड हडपला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. पांढरकवडा मार्ग, आर्णी मार्गसुद्धा अतिक्रमणमुक्त होणार आहे.

१५० जणांचे अतिक्रमण काढले- कळंब चौक व सेवानगर भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. कधी नव्हे तो हा परिसर मोकळा झाला आहे. या ठिकाणी १५० जणांचे अतिक्रमण काढण्यात आले. आता ही मोहीम कळंब चौकापुढेही नागपूर मार्गावर राबविली जाणार आहे. रस्त्यावर फोफावलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघात घडतात. अतिक्रमण झाल्याने गुन्हेगारीलाही पाठबळ मिळते. एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अतिक्रमण बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. 

अतिक्रमणामुळे रस्ते बाधित झाले आहेत, तर काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या आहेत. यातून वाहतुकीची समस्या व आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी या दोन्ही प्रमुख समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे. अतिक्रमण मोहीम ही नागरिकांच्या सुविधेसाठीच राबविली जात आहे.- माधुरी मडावी, मुख्याधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण