शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विहीर खोदताना आढळले पुरातन घराचे अवशेष

By admin | Updated: June 1, 2016 00:03 IST

शेतात विहीर खोदताना तालुक्यातील फत्तेपूर येथे ३० फूट जमिनीखाली पुरातन घर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

फत्तेपूरची घटना : ३० फूट खड्ड्यातील रहस्य पाहण्यासाठी गर्दी, प्रशासनाने घेतली दखल किशोर वंजारी नेरशेतात विहीर खोदताना तालुक्यातील फत्तेपूर येथे ३० फूट जमिनीखाली पुरातन घर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असून प्रशासनाने याबाबीची माहिती पुरातत्व विभागाला दिली आहे. नेर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर फत्तेपूर गाव आहे. नेर येथील साहेब खॉ यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी काही दिवसापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम सुरू केले. खोदकाम करताना जमिनीपासून ३० फूट अंतरावर विटाचे बांधकाम असलेले पुरातन घर आढळून आले. हा प्रकार पाहून ते थक्क झाले. या प्रकाराची माहिती गावातील नागरिकांना मिळाली. त्यामुळे नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी येथे गर्दी केली. विशेष म्हणजे या घरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. घराच्या दरवाज्यात फुटलेल्या माठाचे तुकडेही आढळून आले आहे. कोरीव दगडाचे बांधकाम आहे. नेमका हा काय प्रकार आहे, हे कुणालाही कळायला मार्ग नाही. त्यामुळे विविध चर्चा सुरू आहे. सदर शेतापासून रत्नापूर-फत्तेपूर ही दोन गावे आहे. दोनही गावे तीन किलोमीटर अंतरावर आहे. तसेच सदर शेताच्या सातबाऱ्यावर या ठिकाणी जुन्या विहिरीची नोंद असल्याचे सांगण्यात आले. पंचायत समितीने दिलेल्या धडक सिंचन योजनेतून या विहिरीचे खोदकाम करण्यात येत आहे. मात्र आता या ठिकाणी पुरातन घर सापडल्याने शेत सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाले आहे. याबाबतची माहिती प्रभारी तहसीलदार पी.आर. ताकसांडे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले. तर पोलीस निरीक्षक विजय गराड यांनी शेतात जाऊन या विहिरीची पाहणी केली. याबाबतची माहिती पुरातत्व विभागाला कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात उत्खनन केल्यास आणखी पुरातन अवशेष सापडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मात्र तालुक्यात या रहस्यमय घराची चर्चा जोरात सुरू आहे.